मत्सरातून लहान बहिणीचा खून, गोव्यातील घटना; कुटुंबीयांचे अधिक प्रेम असल्याने मत्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 05:10 AM2017-08-29T05:10:31+5:302017-08-29T05:10:47+5:30
लहान बहिणीला आपल्यापेक्षा कुटुंबीयांचे अधिक प्रेम मिळत असल्याच्या मत्सरातून मोठ्या बहिणीने तिचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सांगे तालुक्यातील बेणवाडा येथे घडला. सोमवारी पोलिसांच्या तपासात ही घटना उघड झाली.
मडगाव (गोवा) : लहान बहिणीला आपल्यापेक्षा कुटुंबीयांचे अधिक प्रेम मिळत असल्याच्या मत्सरातून मोठ्या बहिणीने तिचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सांगे तालुक्यातील बेणवाडा येथे घडला. सोमवारी पोलिसांच्या तपासात ही घटना उघड झाली.
दीड दिवसांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन करून घरी परतलेल्या काजल पप्पू यादव (१२) या छोट्या बहिणीचा गळा दाबून तिच्या मोठ्या बहिणीने खून केला. सांगे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संशयित मुलगी (१४) अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात ठेवले आहे. तिच्या चेहºयावर सख्ख्या बहिणीचा खून केल्याच्या पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता.
सोमवारी पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाला मोठी बहीण नकारार्थी उत्तरे देत होती. पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर तिने खुनाची कबुली दिली. रविवारी रात्री काजल आईजवळ झोपण्यासाठी हट्ट करू लागली. मी झोपेचे सोंग घेऊन सर्व बघत होती.
मी रात्री तीन वाजता उठले. आई व काजल झोपेत होत्या. आईला काहीच न कळता मी काजलच्या गळ्याभोवती नॉयलॉनची दोरी आवळली. ती तडफडू लागली व गतप्राण झाली. नंतर तिचा श्वास सुरू असल्याचे कळल्यावर मी दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला. इतक्यात आई जागी होत असल्याचे पाहून हळूच माझ्या जागेवर जाऊन झोपले.
काजल तडफडत होती, हे मी बघत होते. आई तिला काय झाले असे विचारत होती, तोपर्यंत ती गतप्राण झाली होती, अशी माहिती संशयित अल्पवयीने मुलीने पोलिसांना दिली.
खून का केला, यावर तिने सांगितले की, घरातील सगळी मंडळी काजलवर प्रेम करायची.
मला मात्र कायम दुय्यम स्थान दिले जायचे. माझी कोणीच विचारपूस करीत नसत. त्यामुळे काजलला कायमचे संपवायचे, असा निर्णय घेतला.