धार्मिक स्थळांची मोडतोड प्रकरण : आरोपी बॉयवर एका प्रकरणात आरोप निश्चित, तर दुसऱ्या प्रकरणात निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 06:05 PM2018-01-18T18:05:01+5:302018-01-18T18:05:24+5:30

रस्त्याच्या बाजूला असलेल्या धार्मिक स्थळांची मोडतोड करण्याच्या दहा प्रकरणांतून आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आलेला कुडचडेतील टॅक्सी ड्रायव्हर फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याला मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने गुरुवारी आणखी एका प्रकरणातून आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले.

Debris of Religious Places: Accused accused in one case, accused in second case and innocent in second case | धार्मिक स्थळांची मोडतोड प्रकरण : आरोपी बॉयवर एका प्रकरणात आरोप निश्चित, तर दुसऱ्या प्रकरणात निर्दोष

धार्मिक स्थळांची मोडतोड प्रकरण : आरोपी बॉयवर एका प्रकरणात आरोप निश्चित, तर दुसऱ्या प्रकरणात निर्दोष

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव -  रस्त्याच्या बाजूला असलेल्या धार्मिक स्थळांची मोडतोड करण्याच्या दहा प्रकरणांतून आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आलेला कुडचडेतील टॅक्सी ड्रायव्हर फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याला मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने गुरुवारी आणखी एका प्रकरणातून आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले. तर अन्य एका प्रकरणात मडगावच्याच दुस-या न्यायालयाने त्याच्यावर आरोप निश्चित केले.
गुरुवारी मडगावच्या दोन वेगवेगळ्या न्यायालयांसमोर ही दोन प्रकरणो होती. त्यात 6 जून 2017 या दिवशी चांदर येथे झालेल्या का-या खुरीस मोडतोड प्रकरणात मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नारायण आमोणकर यांनी संशयितावर आरोप निश्चित केले. तर 17 जून 2017 रोजी चांदर येथेच झालेल्या आल्मा खुरीस मोडतोड प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी निलिमा काणकोणकर यांनी बॉयला निर्दोष  मुक्त केले.
जून व जुलै महिन्यात ओळीने कित्येक धार्मिक स्थळांची मोडतोड झाली होती. त्यावेळी रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना रात्री उशिरा टॅक्सीची भाडी मारणा-या या बॉयच्या संशयित हालचाली दिसल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान, कुडचडे येथील गार्डियन एंजल सिमेंट्रीत झालेल्या क्रॉसांच्या मोडतोड झालेल्या स्थळी संशयिताच्या हस्तांक्षरातील कागद मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याने तब्बल 150 मोडतोड प्रकरणांची कबुली दिली होती.
आतार्पयत या संशयितावर वेगवेगळ्या न्यायालयात 19 प्रक़रणात आरोपपत्र दाखल केले होते. त्यातील 11 प्रकरणांतून आरोप निश्र्चितीपूर्वीच त्याची निर्दोष मुक्तता झाली. तर एका प्रकरणात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याला निर्दोष मुक्त केले. या 19 पैकी दोन प्रकरणात त्याच्यावर आरोप निश्चित झाले असून, आणखी सहा प्रकरणो वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत.
चांदरच्या आल्मा खुरीस प्रकरणातून निर्दोष मुक्त करताना न्या.काणकोणकर यांनी संशयिताच्या विरोधात आरोप निश्चित करण्याइतपत एकही पुरावा पुढे आलेला नाही, असे नमूद केले. तर न्या. आमोणकर यांनी प्रथम दर्शनी पुरावा असल्याचे नमूद करुन संशयितावर आरोप निश्चित केले.

Web Title: Debris of Religious Places: Accused accused in one case, accused in second case and innocent in second case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.