निलंबित कर्मचाऱ्याच्या भविष्याचा पुढच्या बैठकीत निर्णय; नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी केले जाहीर

By पंकज शेट्ये | Published: October 23, 2023 07:27 PM2023-10-23T19:27:14+5:302023-10-23T19:27:26+5:30

निलंबित मिल्टनच्या विषयात पुढच्या बैठकीत निर्णय दिला जाणार असल्याचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी बैठकीत स्पष्ट करून तो विषय पुढे ढकलला.

Decision on the future of the suspended employee at the next meeting Girish Borkar announced |  निलंबित कर्मचाऱ्याच्या भविष्याचा पुढच्या बैठकीत निर्णय; नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी केले जाहीर

 निलंबित कर्मचाऱ्याच्या भविष्याचा पुढच्या बैठकीत निर्णय; नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी केले जाहीर

वास्को : पैशांचा घोटाळा केल्याने सहा महीन्यापूर्वी निलंबित केलेला मुरगाव नगरपालिकेचा कर्मचारी मिल्टन डीसोझा याचे पुढे काय करावे याच्यावर चर्चेला सुरवात झाली असता बैठकीत तो विषय बराचवेळ गाजला. काही नगरसेवक मिल्टनच्या बाजूने बोलत होते तर काहींनी तो आणखीन घोटाळ्यात आहे काय त्याबाबतही चौकशी व्हायला पाहीजे अशी मागणी करत होते. मिल्टनच्या विषयात काय करावे त्याबाबत हात उभारून नगराध्यक्षांनी मत मागितले असता दहा नगरसेवकांनी मिल्टनच्या विषयात आजच निर्णय द्यावा तर दहा नगरसेवकांनी तो विषय पुढे ढकलवावा असे मत हात उभारून ठेवले. निलंबित मिल्टनच्या विषयात पुढच्या बैठकीत निर्णय दिला जाणार असल्याचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी बैठकीत स्पष्ट करून तो विषय पुढे ढकलला.

मुरगाव नगरपालिकेने २१ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि.२३) बैठक बोलवली होती. मात्र बैठकीत पालिका संचालक कार्यालयाने निलंबित केलेला मुरगाव पालिकेचा कर्मचारी मिल्टनबाबत पुढे काय करावे हा विषय चर्चेला आल्यानंतर तो तासाहून अधिकवेळ गाजल्याने थोड्याच विषयांवर चर्चा झाली. मुरगाव नगरपालिकेचा कर्मचारी मिल्टनवर सुमारे सहा महीन्यापूर्वी एका पैशाच्या घोटाळ्यात हात असल्याचा आरोप झाल्यानंतर पालिका संचालक कार्यालयाने त्याला निलंबित केले होते. मिल्टन सहा महीन्यापासून निलंबित असून त्याला पगाराचा थोडा भाग (सुमारे ४० हजार) मिळतो. त्याचे पुढे काय करावे ह्या विषयावर बैठकीत चर्चेला सुरवात झाली असता नगरसेवक लीयो रॉड्रीगीस आणि अन्य काही नगरसेवकांनी तो आणखीन कुठल्या घोटाळ्यात शामील आहे काय त्याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली. .

तसेच पुढची चौकशी होईपर्यंत हा विषय पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी बैठकीत केली. तर काही नगरसेवकांनी मिल्टनने स्व:ता घोटाळ्यात शामील असल्याची कबूली देऊन त्यांने ती रक्कम पालिकेला भरण्याचे मान्य केल्याचे सांगितले. मिल्टनने केलेली चुक त्यांने मान्य केली असून सहा महीन्यापासून निलंबित राहून त्यांने त्याची शिक्षा भोगल्याचे त्याच्या बाजूने असलेल्या काही नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे मिल्टनने घोटाळा केलेली ती रक्कम त्याच्याकडून वसूल करून त्याला पुन्हा कामावर घ्यावा अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. तसेच यापूर्वी तो अन्य काही घोटाळ्यात असल्याचे भविष्यात आढळून आल्यास ती रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात यावी असे त्या नगरसेवकांनी सांगितले. मिल्टनवर त्याचे कुटूंब निर्भर असून त्यांने चुक मान्य करण्याबरोबरच घोटाळा केलेली रक्कम भरण्यास स्व:ता होकार दिल्याने त्याला पुन्हा कामावर घ्यावे अशी बैठकीत काही नगरसेवकांनी मागणी केली.

 अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत मिल्टनचा विषय तासाहून अधिक वेळ गाजला. तसेच मिल्टनच्या बाजूने बोलणाऱ्या नगरसेवकात आणि तो अन्य कुठल्या घोटाळ्यात शामील आहे काय त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या नगरसेवकात काहीवेळा संतापाचे वातावरण निर्माण झाले. तो विषय संपत नसल्याचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांना दिसून येताच अखेरीस त्यांनी कीती नगरसेवकांना आजच त्या विषयावर निर्णय पाहीजे आणि कीती नगरसेवकांना तो विषय पुढे ढकलण्यात यावा असे वाटते ते हात वर करून मत द्यावे असे सांगितले. दहा नगरसेवकांनी त्या विषयावर आजच निर्णय द्यावा तर दहा नगरसेवकांनी तो विषय पुढच्या बैठकीपर्यंत पुढे ढकलवावा असे मत हातवर करून दिले. त्यानंतर पुढच्या बैठकीत ह्या विषयात निर्णय घेण्याचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी निश्चित करून तो विषय पुढे ढकलला. मिल्टनला पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे की बडतर्फ करावे त्याचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहीती नगराध्यक्ष बोरकर यांनी पत्रकारांना बैठकीनंतर दिली.

भारतीय नौदलाच्या गोवा विभागाने सेंट ॲन्ड्रु चर्चसमोरील हुतात्मा चौकात नौदलाच्या जहाजाची प्रतिकृती बसवण्यासाठी मागितलेल्या ना हरकत दाखल्यावर बैठकीत चर्चा झाली. मी, मुख्याधिकारी आणि मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी हुतात्मा चौकात प्रतिकृती बसवण्यासाठी मागितलेल्या जागेची पाहाणी केल्याची माहीती नगराध्यक्ष बोरकर यांनी बैठकीत दिली. पाहणीत प्रतिकृती बसवण्यासाठी ती जागा योग्य नसल्याचे (झाडे असल्याने लोकांना दिसून येणार नाही) दिसून आले. त्यामुळे त्यांना आम्ही प्रतिकृती बसवण्यासाठी दुसरी जागा सुचवलेली असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. प्रतिकृती बसविल्यानंतर नौदल त्या जागेवर मालकी हक्क तर दाखवणार नाही ना असा आणि अन्य विविध मुद्दे चर्चेत आले. त्यानंतर नौदलाच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्याच्याशी ह्या विषयात योग्य चर्चा करून नंतर निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. ह्या बैठकीत अन्य काही विषयांवर चर्चा झाली.

Web Title: Decision on the future of the suspended employee at the next meeting Girish Borkar announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा