खाण अवलंबितांच्या मुख्यमंत्र्यांसमोर घोषणा
By admin | Published: March 14, 2015 12:45 AM2015-03-14T00:45:25+5:302015-03-14T00:47:35+5:30
डिचोली : जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मये येथे आलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन सुमारे २०० खाण अवलंबितांनी निवेदन सादर केले.
डिचोली : जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मये येथे आलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन सुमारे २०० खाण अवलंबितांनी निवेदन सादर केले. तसेच हातात फलक घेऊन खाणी लवकर सुरू करा, अशा घोषणा देण्यात आल्या.
भाजपचे उमेदवार शंकर चोडणकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री मये येथे आले होते. या वेळी उपसभापती अनंत शेट इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सभास्थानी येत असताना खाणी त्वरित सुरू करण्याच्या घोषणा देण्यास आरंभ झाला. या वेळी पार्सेकर व्यासपीठावर न जाता ते थेट घोषणा देणाऱ्यांसमोर आले व सरकार खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता बहुतेक सर्व अडथळे दूर झाले आहेत. आता येत्या काही दिवसांत पर्यावरणीय परवान्याचा प्रश्न सुटून खाणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सभेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी खाणीबाबत सविस्तर माहिती दिली व सर्व अडथळे दूर होणार असल्याचे सांगितले. या वेळी खाण अवलंबितांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांना निवेदन सादर करून आपल्या समस्यांकडे लक्ष
वेधले आहे. (प्रतिनिधी)