जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांबाला ‘स्मृतीस्तंभ’ म्हणून घोषित करा - हिंदु जनजागृती समिती
By आप्पा बुवा | Published: June 18, 2023 07:12 PM2023-06-18T19:12:54+5:302023-06-18T19:13:02+5:30
स्मृतीस्तंभ घोषित करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी केली.
फोंडा : जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांबाचे जतन व्हावे, तसेच भावी पिढीला धर्माभिमानी लोकांच्या बलिदाचा इतिहास कळावा, या उद्देशाने गोवा शासनाने ‘हात कातरो’ खांबाला ‘स्मृतीस्तंभ’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी केले. क्रांतिदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी १८ जून या दिवशी ‘हात कातरो’ खांबाला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी सत्यविजय नाईक बोलत होते. या वेळी ‘केरलीय क्षेत्र परिपालन समिती’ बदलापूर (महाराष्ट्र) आश्रमाचे स्वामीजी पी.पी.एम्. नायर्, ‘शिव छत्रपती संघटने’चे सज्जन जुवेकर, आनंद मांद्रेकर, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, श्री गोपाळकृष्ण मंदिराचे अध्यक्ष सत्यवान म्हामल, सचिव अशोक नाईक, दिवाडी येथील विद्याभारती संचालित सेंट एलॉयसियस् विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
सत्यविजय नाईक पुढे म्हणाले, ‘‘हात कातरो’ खांबाची माहिती इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली पाहिजे, तसेच खांबाच्या ठिकाणी खांबाच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती असलेला फलक लावला पाहिजे’’. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी यांनी केले.