दिल्लीतील पर्यटकाचा वागातोर समुद्रकिनारी बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 02:45 PM2023-12-22T14:45:27+5:302023-12-22T14:45:55+5:30
वागाताेर समुद्र किनारी आंघाेळीसाठी गेलेला हा जीवन दत्ता नामक व्याक्ती बुडाला.
नारायण गावस
पणजी: राज्यात पर्यटकांच्या बुडून मरण्याचा घटना दिवसेदिवस वाढत असून आजही वागातोर समुद्र किनारी जीवन दत्ता नामक एका व्याक्तीचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
वागाताेर समुद्र किनारी आंघाेळीसाठी गेलेला हा जीवन दत्ता नामक व्याक्ती बुडाला. त्याला समुद्राच्या पाण्याचा व लटांचा अंदाज न आल्याने तो पाण्यात धडपडत हाेता. त्या ठिकाणी असलेल्या एक परदेशी पर्यटकाने त्याला पाण्यात धडपड असताना पाहिले व त्याला वाचविण्यासाठी त्याने पाण्यात उडी घेतली. त्याला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. तसेच बांबोळी येथील गाेवा वैद्यकीय महाविद्यालयात उपसारासाठी नेले जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व समुद्र किनारे फुल्ल झाले आहेत. बहुतांश पर्यटक हे समुद्र किनारी नियमांचे पालन करत नाही. खाेल समुद्रात जातात. या अगोदरही असे काही देशी विदेशी पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तसेच अनेक पर्यटकांना दृष्टी जीवरक्षकांकडून समुद्रात बुडताना वाचविण्यात आले आहे. काही पर्यटक हे दारुच्या नशेत समुद्रात आंघोळीसाठी जातात. त्यांना पाण्याचा तसेच लाटांचा अंदाज येत नसल्याने ते बुडून मृत्यूमुखी पडतात.