दिल्लीतील बालकाचा कळंगुट येथे बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 07:22 PM2018-06-07T19:22:08+5:302018-06-07T19:22:08+5:30

कळंगुट येथील एका रिसॉर्टच्या जलतरण तलावात पोहताना मूळ दिल्लीतील बालकाचा बुडून दुर्दैवी अंत होण्याची घटना घडली.

Delhi's child drowned in Kalangut | दिल्लीतील बालकाचा कळंगुट येथे बुडून मृत्यू 

दिल्लीतील बालकाचा कळंगुट येथे बुडून मृत्यू 

Next

म्हापसा : कळंगुट येथील एका रिसॉर्टच्या जलतरण तलावात पोहताना मूळ दिल्लीतील बालकाचा बुडून दुर्दैवी अंत होण्याची घटना घडली. घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला घडली. घडलेल्या प्रकारावर हॉटेल व्यवस्थापनाला दोषी ठरवून त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या घटनेची माहिती कळंगुट जवळ असलेल्या कांदोळी येथील आरोग्य केंद्रावरुन पोलिसांना देण्यात आली. घटनेनंतर त्या ९ वर्षीय बालकाला उपचारासाठी तातडीने आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल करण्यात आलेले; पण तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा अंत झालेला. पोलिसांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन पंचनामा केला व त्या बालकाचा मृतदेह नंतर उत्तरणीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून देण्यात आला. तेथे त्याच्यावर शवचिकित्सा करुन नंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. 

सदर बालक आपले पालक तसेच नातेवाईकां समवेत ५ जून रोजी गोवा भेटीवर दाखल झालेले. बुधवारी दिवसभर गोवा दर्शन तसेच कळंगुट परिसराला भेट दिल्यानंतर रात्री वास्तव्य करुन असलेल्या रिसॉर्टवर पुन्हा दाखल झाले. त्यानंतर तलावात उतरुन पोहण्याचा आनंद घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला; पण सदर बालकाने पालकांची नजर चुकवून तो तलावात पोहण्यासाठी उतरला. त्यावेळी तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बालकाचा बुडून दुर्दैवी अंत झाला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी हॉटेलाचा एकही कर्मचारी किंवा जीवरक्षक घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (अ) खाली हॉटेल व्यवस्थापना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 

Web Title: Delhi's child drowned in Kalangut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.