कॅसिनो बंद करण्याच्या मागणीवर विचार : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 07:22 PM2019-05-15T19:22:42+5:302019-05-15T19:23:17+5:30
मांडवीतील कॅसिनो लोकांना नको असल्याने ते बंद करण्याची मागणी प्रदेश भाजपने मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर ठेवली असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मंगळवारी केले होते.
पणजी : मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो बंद करण्याची जी मागणी भाजपने माझ्यासमोर आणली आहे, त्या मागणीवर सरकार विचार करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मांडवीतील कॅसिनो लोकांना नको असल्याने ते बंद करण्याची मागणी प्रदेश भाजपने मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर ठेवली असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मंगळवारी केले होते. पणजीतील कॅसिनोंचा विषय हा निवडणुकीत तापलेला आहे. काँग्रेस पक्ष, गोवा सुरक्षा मंच व आम आदमी पक्षानेही कॅसिनोंचा मुद्दा हाती घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना तेंडुलकर यांच्या विधानाविषयी विचारले. कॅसिनो बंद करण्याची मागणी तुमच्यार्पयत आली आहे काय असे विचारताच मुख्यमंत्री म्हणाले, की मागणी बुधवारीच आपल्यार्पयत पोहचली आहे. बुधवारी भाजपचे निवेदन पोहचले आहे. आपण त्यावर यापुढे विचार करीन. आपण अजून विचार केलेला नाही. कॅसिनो बंद करायचे की काय करायचे ते विचारानंतर सरकार ठरवील.
त्या मुलीचा शोध
दरम्यान, बाबूश मोन्सेरात बलात्कार प्रकरणी जी मुलगी आश्रमातून गायब झाली आहे, तिचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. चौकशी काम सुरू झाले आहे. ती बेपत्ता झाली की तिचे कुणी अपहरण केले की आणखी काय घडले याबाबतचे सत्य लवकरच लोकांना कळून येईल. मी रोज त्याविषयीची माहिती चौकशी यंत्रणोकडून घेत आहे. ती मुलगी ज्या आश्रमात राहत होती, त्या आश्रमातील लोक, ती जिथे शिकत होती, तेथील शिक्षक आणि अन्य घटक यांच्यार्पयत चौकशी यंत्रणा पोहचेल. तिचा शोध घेतलाच जाईल. सरकारची ती जबाबदारी आहे व सरकार जबाबदारी पार पाडत आहे. सत्य काय आहे ते लपून राहणार नाही. मुलीचा शोध लागल्यानंतर सगळे सत्य लोकांसमोर आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.