गोव्यात कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 01:02 PM2018-01-25T13:02:18+5:302018-01-25T13:04:05+5:30

‘राज्यघटना दिवस सांभाळा’ या घोषणोसह धरणे आंदोलन केले.

 Demand movement on behalf of the Communist Party in Goa | गोव्यात कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन

गोव्यात कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन

Next

पणजी : देशभर उद्या, शुक्रवारी 68 वा  प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर देशातील लोकशाही धोक्यात असून, राज्यघटना निधर्मी बनविण्याचा डाव आखला जात असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने (सीपीआय) कंदबा बसस्थानकाजवळील क्रांती चौकात गुरुवारी ‘राज्यघटना दिवस सांभाळा’ या घोषणोसह धरणे आंदोलन केले. 
या आंदोलनात प्रसन्न उट्टगी, ख्रिस्तोफर फोनेस्का, सुहास नाईक, एफजी मास्कारेन्हास यांच्यासह कामगारांची उपस्थिती होती. या आंदोलनात आयटकचे कर्मचारीही सहभागी झाले होते. 

या आंदोलनाविषयी नाईक म्हणाले की, साडेतीन वर्षांत देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे दिसत आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ असलेल्या राज्यघटनेतील ‘निधर्म’ हा शब्द काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यघटनेमुळेच लोकशाही टीकून आहे, त्यामुळे ती श्वास्वत ठेवणे गरजेचे आहे. लोकशाहीने दिलेल्या हक्कांचा गैरवापर सुरू असून देशात विभाजनाचा डाव आखला जात आहे. ‘पद्मावत’ या चित्रपटाला विरोध करण्याच्या नावाखाली शालेय मुलांनावरही हल्ले केले जात आहे, यातून देशात अराजकता माजविण्याचा काही घटकांचा डाव आहे. या घटनेचा सीपीआय आणि आयटकच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. देशभर कम्युनिस्ट पार्टी आंदोलन करीत आहे. 

उट्टगी म्हणाले की, केंद्रातील एनडीएचे सरकार हे आरएसएसच्या तालावर चालत आहे. धान उत्पादनांना हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कुलबर्गी, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाहीत. सोशल नेटवर्किगवर स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकारही राहिला नाही. 

याप्रसंगी आंदोलनकत्र्यानी विविध घोषणांचे फलक हाती घेतले होते. आंदोलनकत्र्यानी अल्पसंख्यांक, दलितांवरील अत्याचार ताबोडतोब थांबवा, धर्मातर करण्याचा डाव थांवबा, जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमी करा, सर्व तरुणांना कामाचा हक्क मंजूर करा, बेरोजगारांना नोकरी द्या अन्यथा बेकार भत्ता द्या, निधर्मी भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करा, लोकशाही जपा-भारत सांभाळा अशा घोषणा दिल्या. 

Web Title:  Demand movement on behalf of the Communist Party in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा