जॉक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाची मागणी सभापतींकडून मान्य करून घेणार - सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 08:26 PM2018-01-17T20:26:02+5:302018-01-17T20:26:15+5:30
जॉक सिक्वेरा यांचा विधानसभेत पुतळा उभा करण्याबाबतची मागणी आम्ही सभापतींसमोर मांडून ती मागणी मान्य करून घेऊ, असे नगर नियोजन मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी बुधवारी येथे सांगितले.
पणजी - जॉक सिक्वेरा यांचा विधानसभेत पुतळा उभा करण्याबाबतची मागणी आम्ही सभापतींसमोर मांडून ती मागणी मान्य करून घेऊ, असे नगर नियोजन मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी बुधवारी येथे सांगितले.
विधानसभा प्रकल्पाची जागा ही सभापतींच्या अधिकार क्षेत्रत येते. तिथे कुणाचा पुतळा उभा करावा की करू नये याविषयीचा निर्णय घेणो हे सभापतींच्या अधिकारात येते, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी नमूद केले होते. त्याविषयी सरदेसाई यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की तांत्रिकदृष्टय़ा मुख्यमंत्री म्हणतात ती गोष्ट खरी आहे. आम्ही सभापतींसमोर आमची मागणी ठेवणार आहोत. स्व. सिक्वेरा यांचा पुतळा उभा रहायला हवा. त्याविषयी तडजोड नाही. आम्ही सभापतींकडून मागणी पूर्ण करून घेऊ.
सरकारने पुतळा उभा केला नाही तर तुम्ही काय करणार असे आताच कुणी विचारू नये. वेळ येईल तेव्हा त्याविषयी भाष्य करता येईल. शितापुढे मीठ खाण्याची गरज नाही,असे मंत्री सरदेसाई म्हणाले.
स्व. ज्ॉक सिक्वेरा यांचा पुतळा उभा केला जावा अशी मागणी गोवा फॉरवर्डने तसेच काँग्रेसनेही केली आहे. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनीही तशी मागणी केली आहे. भाजपचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की सिक्वेरा यांचा पुतळा उभा करण्यास आपला आक्षेप नाही. पुतळ्य़ाची जागा कोणती असावी ते शेवटी सभापती ठरवतील. तथापि, जनमत कौलाचे कुणीच राजकारण करू नये. जनमत कौल दिन शासकीय स्तरावर साजरा करायला हवा आणि सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा हे कळण्यासाठी 51 वर्षाचा कालवधी लागला काय असा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो.काँग्रेस पक्ष देखील अनेक वर्षे सत्तेत होता. त्या पक्षाने सिक्वेरा यांचा पुतळा उभा केला नाही किंवा सरकारी पातळीवर जनमत कौल दिवस साजराही केला नाही. आता सगळ्य़ाच मागण्या होत असल्याने राजकारणाचा वास येतो.
आपण दहा वर्षापूर्वी कळंगुट येथे जॉक सिक्वेरा यांचा पुतळा उभारला असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. एकेकाळी जे घटक गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण मागत होते, त्यांना देखील ते का विलीनीकरण मागत होते ते ठाऊक नसेल. गोवा मुक्त झाला त्यावेळी गोवा हे एक स्वतंत्र राष्ट्र असावे अशीही मागणी काहीजण करत होते.
....