बापरे वास्कोत डेंग्यूचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:08 PM2019-09-25T18:08:26+5:302019-09-25T18:08:29+5:30

अडीच महिन्यांत वास्कोत चार जणांचा मृत्यू: गेल्या अडीच महीन्यात वास्कोत आढळले १६३ डेंग्यूचे संशयित रुग्ण

Dengue swells at Bapre Vasco | बापरे वास्कोत डेंग्यूचा विळखा

बापरे वास्कोत डेंग्यूचा विळखा

googlenewsNext

वास्को: गेल्या अडीच महीन्यांत वास्को व परिसराच्या भागात डेंग्युच्या संशयित रुग्णांत दिवसेंन दिवस वाढ होत आहे. या काळात ४ जणांचा डेंग्युसदृश तापाने मृत्यू झाल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण आहे.


वास्को व परिसरातील भागात अनेक ठिकाणी झाडांच्या कुंड्या , नारळाच्या कवचांत, पाण्याच्या बॅरलामध्ये डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची पैदास होत असल्याचे दिसून आले आहे. वास्को व परिसरात पसरणाºया डेंग्यूवर रोख लावण्यासाठी शहरी आरोग्य केंद्र तसेच संबंधित यंत्रणा विविध पावले उचलत आहेत, मात्र जोपर्यंत नागरिकांचे पूर्ण सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत डेंग्यूवर रोख लावणे कठीण असल्याचे वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांनी सांगितले.
जुलै महीन्यापासून आजतागायत वास्को व परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यचेू रुग्ण आढळलेले आहेत. सध्या चिखली उपजिल्हा इस्पितळ तसेच काही खासगी इस्पितळांत डेंग्यू झाल्याने रुग्ण उपचार घेत असताना दिसून येत आहेत. जुलै महिन्यापासून अजूनपर्यंत वास्को १६३ डेंग्यू झालेले रुग्ण आढळल्याने नागरिकांत याबाबत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वास्कोतील नवेवाडे, वाडे, बायणा, मंगोरहील, शहरात अशा विविध ठिकाणी डेंग्यचे रुग्ण या काळात आढळलेले असून प्रत्येक दिवशी नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहीती उपलब्ध झालेली आहे. तसेच जुलै महीन्यांपासून अजून डेंग्यूसदृश तापावर इस्पितळात उपचार घेत असताना चार जणांचा मृत्यू झालेला असून यात तीन पुरूषांचा तसेच एका महीलेचा समावेश आहे. डेंग्यू आजारात वाढ होण्याबरोबरच चार जणांना यामुळे मृत्यू आल्याने सध्या वास्को व जवळपासच्या परिसरात या विषयावरून भिती निर्माण झाली आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांना संपर्क केला असता आमच्या तसेच संबंधित विभागाचे अधिकारी डेंग्यूवर पूर्णपणे आळा आणण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलत असल्याची माहीती त्यांनी दिली. ज्या ज्या ठिकाणी डासांची पैदास होत आहे तेथे तेथे जाऊन योग्य पावले उचलण्याचे काम आरोग्य केंद्राचे अधिकारी करत असून औषधांची फवारणी, विविध ठिकाणी साचलेले पाणी खाली करणे अशा सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची माहीती डॉ. खांडेपारकर यांनी दिली. लोकांत डेंग्यू पसरु नये यासाठी आरोग्य केंद्र संबंधित पावले उचलतच आहे. मात्र, नागरीकांचाही यासाठी पूर्ण सहयोग असणे गरजेचे असल्याचे डॉ. खांडेपारकर यांनी सांगितले. आपल्या परिसराबाहेर असलेल्या छोट्या मोठ्या वस्तंूमधे पाणी साचू नये यासाठी प्रत्येकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे असून अशा प्रकारची दक्षता प्रत्येकाने घेतली नसल्यास डेंग्यूवर रोख लावणे एकेप्रकारे अशक्यच असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येकाने आपल्या व आपल्या परिसरात राहणाºया नागरिकांच्या हितासाठी खबरदारी बाळगणे गरजेचे असून असे केले तरच डेंग्यूवर आळा आणणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सध्या वास्को शहरातील एकंदरीत सर्वच भागात डेंग्यू पसरविणाºया डासांची विविध ठिकाणी पैदास होत असल्याचे दिसून आले असून अशा प्रकारच्या डासांना नष्ट करण्यासाठी आरोग्य केंद्र सतत पावले उचलत असून नागरिकांनीही यासाठी सहयोग करणे गरजेचे आहे. काही प्रकरणात लोकांच्या घरात असलेल्या पाण्याच्या बॅरलमध्ये सुद्धा डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास होत असल्याचे माहीती रश्मी खांडेपारकर यांनी देऊन वेळोवेळी नागरिकांनी साचलेले तसेच बॅरलमध्ये उघडे ठेवलेले पाणी रिकामी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे माहीतीत सांगितले.

परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास
डेंग्यू आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी वेळोवेळी विविध ठिकाणी आमचे अधिकारी जेव्हा जातात त्या वेळी रस्त्यावर अथवा लोकांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या नारळाच्या कवचात साचलेल्या पाण्यात, झाडांच्या कुंडयात साचलेल्या पाण्यात, उघडयावर ठेवलेल्या बॅरलमधील पाण्यात, विविध ठिकाणी फेकण्यात आलेल्या टायरमध्ये साचलेल्या पाण्यात अशामध्ये डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास होत असल्याचे दिसून आलेले असल्याची माहिती डॉ. खांडेपारकर यांनी पुढे दिली.

Web Title: Dengue swells at Bapre Vasco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.