पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचा पर्यावरण मंत्र्याकडून इन्कार
By वासुदेव.पागी | Published: December 28, 2023 05:38 PM2023-12-28T17:38:51+5:302023-12-28T17:39:51+5:30
आपल्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचा आरोप गोव्याचे पर्यावरण मंत्री लेक्स सिकवेरा यांनी फेटाळला आहे.
वासुदेव पागी, पणजी: आपल्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचा आरोप गोव्याचे पर्यावरण मंत्री लेक्स सिकवेरा यांनी फेटाळला आहे. माजी मंत्री मिकी पशेको यांनी त्यांच्यावर पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचा आरोप केला होता.
मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले की कोणीही काहीही आरोप केले किंवा तक्रारी केल्या तरी मला फरक पडत नाही. कारण माझ्याकडे विदेशी पासपोर्ट नाही आहे. त्यामुळे मला चिंता करण्याची गरजच नाही.
माजी मंत्री पाशेको यांनी सिक्वेरा यांचा कथित विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. ते वारंवार पत्रकार परिषदा घेऊन पर्यावरण मंत्रावर टीका करीत आहेत. मंत्र्याचा जन्म केनियात झाला होता आणि त्यांनी पोर्तुगीज पासपोर्ट बनविला होता असा आरोप ते सातत्याने करीत आहेत. मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच गोवा पासपोर्ट कार्यालयातही त्यांनी मंत्र्याविरुद्ध तक्रार केली आहे. भारतीय नागरिकत्व गमावलेल्या इतर लोकाप्रमाणेच सिक्वेरा यांचेही भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाशेको यांनी पासपोर्ट अधिकार्यांना पत्र लिहिले असून, सिक्वेरांचे नागरिकत्व रद्द केले नाही तर १५ दिवसांत पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.