आयुष्मान भारत योजनेसाठी खात्यांंर्गत जनजागृती शिबीरे; आराेग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 05:19 PM2023-12-30T17:19:40+5:302023-12-30T17:20:36+5:30
गावागावात लाेकांमध्ये या योजने विषयी जागृता केली जात असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
नारायण गावस,पणजी: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेबद्दल लोकांना जागरूत करण्यासाठी आराेग्य खाते तसेच महिला बालकल्याण खात्याकडून जनजागृती शिबिरे आणि मोहिमेचे आयोजन सुरु आहे. गावागावात लाेकांमध्ये या योजने विषयी जागृता केली जात असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
आराेग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, हा देशातील आरोग्यसेवा प्रवेशामध्ये बदल करणारा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. आरोग्य खाते आणि महिला व बाल कल्याण खाते त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे काम करत आहेत. यामुळे सर्वांना चांगली आराेग्य सुविधा मिळणार आहे. आभा ही योजना प्रत्येक महिला आणि मुलाला त्यांचे स्थान किंवा सामाजिक आर्थिक स्थिती विचारात न घेता दर्जेदार आरोग्य सेवांमध्ये प्रवेश करण्याची सुविधा देणार. या दर्जेदार आराेग्य सुविधांचा लाभ लोकांना व्हावा हा या योजने मागचा मुख्य हेतू आहे.
मंत्री राणे पुढे म्हणाले, भारताच्या डिजिटल आरोग्य सेवा परिसंस्थामध्ये लोकांना सहभागी करून घेण्यासाठी आरोग्य खाते आणि महिला व बाल कल्याण खाते, सरकारी रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अंगणवाड्यांमध्ये जनजागृती शिबिरे आणि मोहिमेचे आयोजन सुरु आहे. एकत्रितपणे आपण अधिक मजबूत आणि विकसित भारत मध्ये योगदान देऊन एक निरोगी आणि अधिक सशक्त गोवा तयार करू शकतो.