राष्ट्रध्वजाचा अवमान; तिरंग्यावर दुसरे चित्र दाखविले, गुन्हा नोंद
By वासुदेव.पागी | Published: August 17, 2023 07:39 PM2023-08-17T19:39:56+5:302023-08-17T19:40:19+5:30
सांताक्रूझ येथील नाझारियो डिसोझा याच्या विरोधात गुन्हा
वासुदेव पागी, पणजी: राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याच्या प्रकरणात जुने गोवे पोलिसांकडून सांताक्रूझ येथील नाझारियो डिसोझा याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. नाझारियो याने चार दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला होता. त्यात तिरंग्यावर सरड्याचे चित्र दाखविले होते. त्याखाली जीडीपी असा उल्लेख होता तर सरड्याजवळ डीपी असे लिहिले होते. या पोस्टला अनेकांनी आक्षेप घेऊन एडमीनकडे रिपोर्टही केला होता.
नाझारियो याच्या विरोधात काही जणांनी पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ५०० अंतर्गत बदनामी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
या विषयी माहिती देताना जुने गोवेचे पोलीस निरीक्षक सतीश पडवळ यांनी सांगितले की या प्रकरणात तक्रार नोंदविण्यात आली होती. तक्रारीला अनुसरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच संशयित नाझारियो याला सीआरपीसी कलम ४२ अंतर्गत चौकशीसाठी नोटीसही बजावण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.