बायणा किनाऱ्याच्या विकासाचा निर्धार
By admin | Published: April 19, 2015 01:02 AM2015-04-19T01:02:06+5:302015-04-19T01:02:17+5:30
वास्को : कित्येक वर्षे वास्को शहर विकासापासून दूर राहिले आहे़ वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या अथक परिश्रमाने सुमारे नऊ कोटी रुपये
वास्को : कित्येक वर्षे वास्को शहर विकासापासून दूर राहिले आहे़ वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या अथक परिश्रमाने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास करणारा प्रकल्प आलेला आहे. त्यास मोजक्याच लोकांकडून अनेक कारणे पुढे करून विरोध होत आहे़ विरोधकांच्या या प्रयत्नांना समर्थपणे लढा देऊन त्यांचा बीमोड करण्याचा निर्धार शनिवारी (दि.१८) वास्कोवासियांनी केला़
संध्याकाळी बायणा रवींद्र भवन जवळ वास्कोतील काही नागरिकांनी बायणा समुद्रकिनारा सुशोभीकरण प्रकल्पास पाठिंब्यासाठी येथील समाज कार्यकर्ते जयंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते़ त्या वेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर या सभेतील अनेक वक्त्यांनी प्रकल्पास पाठिंबा दिला. तसेच वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून या प्रकल्पाविरुध्द लढा देणाऱ्यांना समर्थपणे तोंड देण्याचा निर्धार केला़
वास्को शहर हे जरी विमानतळ, मुरगाव बंदर व रेल्वेमुळे प्रसिध्द असले तरी विकासाच्या दृष्टीने मागासलेले आहे़ शहरात जरी विमानतळ आणि रेल्वे टर्मिनल असला तरी या मार्गाने येणारे प्रवासी पर्यटनाच्या नावाने या शहराची प्रसिध्दी नसल्याने थेट राजधानी किंवा इतर ठिकाणच्या पर्यटनस्थळी जातात़ शिवाय हे शहर एका टोकाला असल्याने या शहरातील सर्व व्यवहार या शहरापुरते मर्यादित असतात़ तसेच या शहरात पर्यटनस्थळांचा अभाव असल्यामुळे या शहरात पर्यटकही फि रकत नाही़ या सर्व कारणांमुळे हे शहर विकासापासून अलिप्त राहिलेले आहे़ या शहरात नयनरम्य असा समुद्रकिनारा असूनही या किनाऱ्याची पर्यटकांना ओळखही नाही़ निदान या समुद्रकिनाऱ्याचा विकास करून या शहराचे नाव पर्यटनस्थळावर आणण्यासाठी वीजमंत्र्यांनी कंबर कसली आहे. सुमारे ९ कोटी रुपये खर्चून सुमारे ५ किलोमीटरची किनारपट्टी असलेल्या समुद्रकिनाऱ्याचा विकास करणारा हा प्रकल्प हाती घेतला आहे़ या समुद्रकिनाऱ्यावर अगदी वाळूत आणि समुद्र भरती रेषेच्या आत काही परप्रांतीयांनी बेकायदेशीरपणे
आपल्या झोपड्यावजा घरे उभारलेली आहेत़ या बेकायदेशीर घरांना आरोग्याच्या दृष्टीनेही कोणत्याच सुविधा नसल्याने नैसर्गिक विधी या किनाऱ्यावरच करून किनारा दुर्गंधीमय करण्यात येतो़ अशा परिस्थितीत या किनाऱ्याचा विकास होऊच शकत नसल्याने ही बेकायदेशीर घरे हटविणे अत्यंत गरजेचे आहे़; पण या घरमालकांकडून किनारा सुशोभीकरणास विरोध होत
आहे़ बेकायदेशीर झोपडपट्टीवासियांकडून होणाऱ्या विरोधामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे़ त्यांचा हा विरोध मोडून काढण्याचा निर्धार सभेत करण्यात आला. संतोष खोर्जुवेकर यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनीच आभार मानले़ (प्रतिनिधी)