रामललाचे दर्शन घेत भक्त अयोध्येहून परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 02:53 PM2024-02-22T14:53:39+5:302024-02-22T14:54:20+5:30
अयोध्येमध्ये जाणाऱ्यांमध्ये ८० ते ९० वर्षे वयाचे पुरुष व महिला यांचाही सहभाग होता.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : अयोध्या येथे गेलेल्या रामभक्तांना घेऊन 'आस्था' ही विशेष रेल्वे रविवारी सकाळी थिवी रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झाली. अयोध्येतून परतलेल्या भक्तांनी राम लल्लाचं दर्शन घेऊन आयुष्याचं सार्थक झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले. अयोध्येमध्ये जाणाऱ्यांमध्ये ८० ते ९० वर्षे वयाचे पुरुष व महिला यांचाही सहभाग होता.
पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर बांधून हिंदूवर उपकार केले असल्याचे प्रतिभा वझे यांनी सांगितले. शाम मातोंडकर म्हणाले की, सरकारने अयोध्येत नेवून रामाचे दर्शन घडवले. तेथे सगळे मंत्री, आमदार, कार्यकर्ते भेटून विचारपूस केली. कसलीच कमतरता भासू दिली नाही. आमच्याबरोबर मोठ्या प्रमाणात तरुण होते ते सनातनची पताका पुढे नेताना दिसत होते, असे सांगितले.
आरती तिनईकर म्हणाल्या की, अयोध्येतून गोव्याला परत येताना आम्हाला कसलाच त्रास झालेला नाही. सरकारने रामाचे दर्शन, राहण्याची सोय, जेवण आणि रेल्वेत सगळ्याची काळजी घेतली. सरकारने असंच पुढेही रामभक्तांना अयोध्या दर्शन घडवावं. शंकर गाड यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, खासदार श्रीपाद नाईक, भाजपाचे पदाधिकारी यांचे आभार मानले. पल्लवी कवळेकर यांनी जेव्हा रामलल्लाला बघितलं आणि आयुष्याचं सार्थक झाल्याचे समाधान मिळाल्याचे सांगितले.