काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली का?, भाजपाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 07:29 PM2020-06-23T19:29:00+5:302020-06-23T19:31:48+5:30
भाजपाचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई व उपाध्यक्ष अनिल होबळे यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
पणजी : कोरोना संकट काळात काँग्रेसच्या नेत्यांनी घरात बसून ऑनलाईन पत्रके काढली. भाजपाचे कार्यकर्ते लोकांर्पयत गेले. काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते लॉकडाऊन काळात लोकांना मदतीसाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतरले काय? त्यांनी लोकांना थोडी तरी मदत केली काय?, असे प्रश्न भाजपा नेत्यांनी मंगळवारी विचारले.
भाजपाचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई व उपाध्यक्ष अनिल होबळे यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी, काँग्रेस नेत्यांना काही उद्योग नाही. भाजपा ऑनलाईन सभांवर लाखो रुपये खर्च करत असल्याचा खोटा आरोप ते करतात. भाजपाच्या गोव्यातीलही सर्व कार्यकत्र्यानी व नेत्यांनी व एकूणच सरकारने कोरोना संकट काळात लोकांना मदत केली. कार्यकर्ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता घरोघर फिरले. लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला, असे फळदेसाई म्हणाले.
याचबरोबर, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आता तरी सक्रीय करावे. संघटनेतील विस्कळीतपणा जमल्यास दूर करावा. कामत, खलप यांसारखे नेते लॉक डाऊनच्या काळात स्वत:च्या घरात बसून राहिले. लोकांना मदतीसाठी ते फिरले नाहीत. घरी एसी खोलीत बसून पत्रके काढली. काँग्रेसच्या नेत्यांना आता उद्योग नसल्यानेच ते काहीही बोलतात. सध्या सरकारकडे फक्त 20 टक्के उत्पन्न येते, 80 टक्के महसूल येत नाही. तरी देखील मुख्यमंत्री सावंत हे कोविड विरोधी उपाययोजना व अन्य आघाड्यांवर चांगले काम करत आहेत, असे फळदेसाई यांनी सांगितले.
बँक संपवली
रमाकांत खलप यांनी म्हापसा अर्बन बँक रसातळाला नेली. बँकेची वाट लावल्यानंतर आता ते बोलतात तरी कसे असा प्रश्न होबळे यांनी विचारला. लोकांना स्वत:च्या कष्टाचे देखील पैसे म्हापसा अर्बन बंकेतून काढता येत नाहीत, असे होबळे म्हणाले. गडकरी यांनी गोव्यातील तिसरा मांडवी पूल, राष्ट्रीय महामार्ग व अन्य अनेक प्रकल्पांसाठी गोव्याला मदत केली, असे होबळे म्हणाले.
आणखी बातम्या...
वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका
दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक
हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'
"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!