मी जीव द्यायला हवा होता का? शिरोडकरांचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 09:21 PM2018-10-19T21:21:57+5:302018-10-19T21:22:10+5:30
शिरोडय़ातील 1 लाख 84 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन ही माझी होती. माजी मंत्री महादेव नाईक यांनी ही जमीन औद्योगिक वसाहतीसाठी अधिसूचित करणो सुरू केले होते.
पणजी - शिरोडय़ातील 1 लाख 84 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन ही माझी होती. माजी मंत्री महादेव नाईक यांनी ही जमीन औद्योगिक वसाहतीसाठी अधिसूचित करणो सुरू केले होते. मला एक इंच देखील जमीन ठेवली नव्हती. 2016 च्या कालावधीत मी, माझ्या संस्था आणि माझे कुटूंब संकटात होते. जमीनही गेली व माझे पैसेही गेले अशी स्थिती होती. पर्रीकर सरकारने 70 कोटी रुपयांची जी जमिनीची किंमत दिली ती चुकीची नाही. ते माझे हक्काचे पैसे आहेत, असे सुभाष शिरोडकर यांनी शुक्रवारी सांगितले. जमीनही नाही व पैसाही नाही अशा स्थितीत 70 कोटी रुपयांची भरपाई न स्वीकारता मी काय करायला हवे होते? मी मांडवीत जाऊन जीव द्यायला हवा होता का अशी विचारणा शिरोडकर यांनी केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यासोबत शिरोडकर यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. आपल्या भाजप प्रवेशाचे शिरोडकर यांनी समर्थन केले. काँग्रेसमध्ये मी 30 वर्षे राहिलो. यावेळी देशात व गोव्यातही काँग्रेसची स्थिती ठिक नाही. गोव्यात विकास कामे भाजपच्याच राजवटीत होतात. शिवाय गोव्याचा खाणप्रश्नही भाजपच्याच राजवटीत सुटू शकेल, काँग्रेसला ते जमणार नाही. म्हणून मी भाजपमध्ये गेलो, असे शिरोडकर म्हणाले. 2006 साली मी शिरोडय़ातील 1.84 लाख चौरस मीटर जमीन जमीन मालकाकडूनच खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी मी करार केला होता. 2016 च्या आसपास करार पूर्ण झाला. मी त्यासाठी कर्ज घेतले होते. माझ्या पूर्ण जागेत औद्योगिक वसाहत आणण्याचा घाट घातला गेला. मी न्यायालयात गेलो. न्यायालयाने 15 दिवसांत अॅवार्ड देण्यास सरकारला सांगितले. मी 2017 च्या निवडणुकीत जिंकून आलो व मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे स्थिती मांडली. जमिनीची किंमत 70 कोटी झाली. मला व्याजावर पाणी सोडावे लागले. एकूण सात वर्षात सात हप्त्यांमध्ये 70 कोटी रुपये देणो र्पीकर यांनी मान्य केले. पहिला हप्ता म्हणून 9 कोटी 78 लाख रुपये दिले. त्यापैकी 78 लाख करापोटी गेले. उर्वरित पैसे माझ्या शैक्षणिक संस्थांसाठी मी वापरले. यापुढेही 70 कोटींपैकी जे पैसे येतील त्यातील 80 टक्के पैसे मी सामाजिक उपक्रमांसाठी वापरीन. मला स्वत:ला पैसे नको आहेत, असा दावा शिरोडकर यांनी केला.
आयटी हॅबिटेट हवे
शिरोडय़ातील ती 1.84 लाख चौमी जागा आता सरकारच्या ताब्यात असून तिथे आयटी पार्क उभे केले जावे असे मी सरकारला सूचवीन. शिरोडय़ातील अनेक युवा-युवती शिकत आहेत. डॉक्टर, अभियंते बनून विदेशात जात आहेत. शिरोडय़ात आयटी पार्क झाले तर स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होईल. माङया शैक्षणिक संस्थेत प्राथमिक स्तरावर सगळी मुले वार्षिक केवळ 350 रुपये खर्च करून शिकतात,असे शिरोडकर यांनी सांगितले.