खंवटेप्रश्नी राज्यपालांना साकडे, तोडगा निघेल- कामत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 10:53 PM2020-02-07T22:53:14+5:302020-02-07T22:55:13+5:30

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना मध्यरात्री झालेल्या अटकेबाबत न्याय मागण्यासाठी सर्व विरोधी आमदारांनी शुक्रवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली.

digambar kamat says rohan khaunte arrest issue will resolve | खंवटेप्रश्नी राज्यपालांना साकडे, तोडगा निघेल- कामत

खंवटेप्रश्नी राज्यपालांना साकडे, तोडगा निघेल- कामत

Next

पणजी : अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना मध्यरात्री झालेल्या अटकेबाबत न्याय मागण्यासाठी सर्व विरोधी आमदारांनी शुक्रवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. त्यांनी राज्यपालांसमोर स्थिती मांडली व या विषयात लक्ष घालावे अशी त्यांनी राज्यपालांना विनंती केली. आपण याविषयी सरकारशी बोलेन, असे आश्वासन राज्यपालांनी विरोधी आमदारांना दिले.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रतापसिंग राणे, रवी नाईक, लुईङिान फालेरो, विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, खंवटे, जयेश साळगावकर, आलेक्स रेजिनाल्ड व विनोद पालयेकर हे नऊ आमदार दुपारी एकच्या सुमारास दोनापावल येथे राजभवनवर गेले. तत्पूर्वी त्यांनी सभात्याग केला होता. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना एखाद्या आमदाराला खोटय़ा तक्रारीवरून मध्यरात्री अटक होते हे गंभीर आहे असा मुद्दा कामत यांनी राज्यपालांसमोर मांडला. राज्यपाल जास्त काही बोलले नाही पण आपण सरकारशी बोलेन अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्व विरोधी आमदारांनी एकत्रपणो एक निवेदनही राज्यपालांना सादर केले. लोकशाही धोक्यात आहे, असे आमदार म्हणाले.

दरम्यान, कामत यांनी नंतर पत्रकारांना सांगितले, की चार माजी मुख्यमंत्र्यांना सभागृहातून सभापतींकडून बाहेर काढले जाते व मग सरकार अर्थसंकल्पाचे वाचन करते असे गोव्याच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. आम्ही खंवटेंच्या अटकेविषयी निर्माण झालेला वाद सोडवा अशी विनंती सभापतींना करत होतो पण कुणीच तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आम्हाला राज्यपालांकडे दाद मागावी लागली. राज्यपाल निश्चीतच काही तरी तोडगा काढतील.

प्रतापसिंग राणे यांनीही पत्रकारांना सांगितले, की खंवटे यांनी खरोखर कुणाला धमकी दिली की नाही याची अगोदर सभापतींनी चौकशी करून घ्यायला हवी होती. सभापतींनी खंवटे यांना कारणो दाखवा नोटीस पाठवायला हवी होती. मध्यरात्री पोलीस येऊन आमदाराला अटक करतात म्हणजे काय? हे काय पोतरुगीज काळातील मोंतेरोचे राज्य आहे काय असे प्रश्न राणोंनी केले. आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत. रस्त्यावर भांडण करणारे कुणी पोर नव्हे आम्ही असे राणे म्हणाले.

Web Title: digambar kamat says rohan khaunte arrest issue will resolve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.