दिगंबर कामतांनी एसटी समाजाची माफी मागावी; एसटी समाजाच्या नेत्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 02:40 PM2023-11-17T14:40:04+5:302023-11-17T14:40:40+5:30
रामा काणकाेणकर म्हणाले दिगंबर कामत हे एसटी समाजाविरोधात आहेत.
नारायण गावस, पणजी: माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी राज्यातील एसटी (अनुसुचित जमाती) समाजाची मााफी मागावी. अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत एसटी समाज भाजपला धडा शिकविणार आहे, असे एसटी समाजाचे नेेते रामा काणकाेणकर यांनी पणजी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मिशन पॉलिटीकल या संघटनेने केलेल्या आंदाेलनात काही लाेक राजकारण करत असल्याचा आरोप आमदार दिगंबर कामत यांनी केला हाेता.
रामा काणकाेणकर म्हणाले दिगंबर कामत हे एसटी समाजाविरोधात आहेत. त्यांना हा समाज पुढे गेलेेले नको आहे. त्यांना फक़्त आपल्या समाजाचे लोक राजकारणात आलेले हवे आहेत. ज्यावेळी कॉग्रेस सत्ता असताना दिगंबर कामत मुख्यमंत्री होते त्यावेळी असे आरक्षणासाठी उटा आंदोलन झाले होते. यावेळी आमच्या समाजाच्या २ युवकांचा बळी गेला होता. यालाही जबाबदार दिगंबर कामत आहे. स्वत:च्या फायद्यासाठी कॉग्रेस साेडून भाजपात आले आहे, असेही काणकाेणकर म्हणाले.
लोकसभेत धडा शिकव
काणकोणकर पुढे म्हणाले, सध्या दिगंबर कामत यांना दक्षिण गोव्यातील लोकसभेची भाजपची उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा आहे. भाजप दिगंबर कामत यांना उमेदवारी दिली तर दक्षिण गोव्यात २ लाखंवर मतदार हे एसटी समाजाचे आहेत. हा पूर्ण समाज त्यांच्या विरोधात मतदान करणार आहे. त्यांनी या समाजाला कमी समजू नये. आम्ही आमचे हक्क मागत आहोत. यात कुठेच राजकारण केले जात नाही. भाजपचे मंत्री आमदार यात राजकारण करत आहे. आम्हाला आमच्या या समाजाला न्याय हवा आहे, असेही रामा काणकाेणकर म्हणाले.