दिगंबर कामतांच्या घरावर छापा
By admin | Published: August 21, 2015 01:49 AM2015-08-21T01:49:46+5:302015-08-21T01:50:03+5:30
मडगाव/पणजी : जैका लाच प्रकरणात न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होऊन २४ तास होण्यापूर्वीच मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट
मडगाव/पणजी : जैका लाच प्रकरणात न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होऊन २४ तास होण्यापूर्वीच मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील निवासस्थानावर तसेच कामत यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर केंद्रीय अंमलबजावणी खात्याच्या (ईडी) गोवा विभागाकडून क्राईम ब्रँचच्या मदतीने छापे टाकण्यात आले. यात महत्त्वाची कागदपत्रे आणि विदेशी चलन जप्त करण्यात आले.
लुईस बर्जर प्रकरणात अंमलबजावणी विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर आता या विभागाकडून छापासत्र सुरू करण्यात आले आहे. कामत यांच्या निवासस्थानी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. सुमारे दोन तास तो चालू होता. या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांसमवेत गोवा क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई हेही उपस्थित होते. या छाप्यावेळी घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दोन वाहने भरून पोलीस आणले होते.
कामत यांचे नातेवाईक गौरीश ऊर्फ पिंकी लवंदे यांचे कांपाल येथील निवासस्थान व कार्यालय, पणजीतील अल्फ्रान प्लाझा इमारतीतील नीलेश लवंदे यांच्या कार्यालयावर छापे (पान २ वर)