दिगंबर कामत यांच्या अटकेची गरज नाही!
By admin | Published: August 20, 2015 02:16 AM2015-08-20T02:16:59+5:302015-08-20T02:17:21+5:30
पणजी : जैका प्रकल्पासाठी लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीकडून कथित लाच घेतल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटक करण्यास मज्जाव
पणजी : जैका प्रकल्पासाठी लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीकडून कथित लाच घेतल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटक करण्यास मज्जाव करणारा निवाडा देताना पणजी विशेष न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. संपूर्ण गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिलेला हा निवाडा न्या. भारत देशपांडे यांनी बुधवारी सकाळी १० वाजता दिला.
क्राईम ब्रँचमध्ये बोलावल्यानंतर कामत यांनी क्राईम ब्रँचच्या कार्यालयात येऊन चौकशीस हजेरी लावली आणि कामत
यांची कोठडी नेमक्या कोणत्या कारणासाठी हवी, हे पोलिसांनी स्पष्ट केले नसल्याचे सांगून न्यायाधीशांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
अर्ज मंजूर करतानाच १ लाख रुपये हमी, एक हमीदार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोवा सोडून न जाणे, आवश्यकतेनुसार तपास एजन्सीसमोर उपस्थित राहाणे, पासपोर्ट न्यायालयात
सादर करणे या अटींवर न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या ४९ पानांच्या आदेशात न्यायमूर्ती देशपांडे यांनी कामत हे दोन वेळा चौकशीसाठी हजर राहिल्याचे आणि तपासकार्याला सहकार्य केल्याचा उल्लेख केला आहे.
कामत हे तपासासाठी सहकार्य करत नसल्याचा क्राईम ब्रँचचे वकील गुरुप्रसाद कीर्तनी यांनी केलेला दावा स्वीकारण्यात आला नाही. (प्रतिनिधी)