दिगंबर कामतांचा डाव उलटला!
By Admin | Published: August 13, 2015 01:58 AM2015-08-13T01:58:11+5:302015-08-13T01:58:44+5:30
पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी माहिती अधिकाराखाली स्वत:च केलेल्या अर्जाला उत्तरादाखल चुकीची माहिती देण्यास भाग पाडल्याची कबुली ‘जैका’च्या
पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी माहिती अधिकाराखाली स्वत:च केलेल्या अर्जाला उत्तरादाखल चुकीची माहिती देण्यास भाग पाडल्याची कबुली ‘जैका’च्या सर्व्हेक्षण अधिकाऱ्याने दिली. यामुळे कामत यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सर्व्हेक्षण अधिकारी उदयकुमार मांडवेलकर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान अभियंते दत्तात्रय बोरकर यांनी ही कबुली दिली आहे.
‘लुईस बर्जर कंपनीशी करण्यात आलेल्या करारासंबंधीची महत्त्वपूर्ण फाईल क्राईम ब्रँचने नेली,’ अशी माहिती
कामत यांच्या माहिती हक्क कायद्याखालील अर्जाला उत्तर देताना द्या, असे आपल्याला सांगण्यात आले होते. त्यासाठी कामत यांच्याकडून अन्य एका व्यक्तीमार्फत दबाव टाकण्यात आला
होता, असे त्यात म्हटले आहे. हा कबुलीजबाब गुरुवारी न्यायालयातही
सादर होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण फाईल गायब झाल्याचा वारंवार उल्लेख होत
होता. ती फाईल कुठे आहे, याची माहिती घेण्यासाठी दिगंबर कामत यांनी जैकाच्या कार्यालयात माहिती हक्क कायद्याखाली अर्ज केला होता. (प्रतिनिधी)