"दिक्षाला समुद्रात बुडवून गुदमरुन मारले"; मृतदेह कुटुंबीयाच्या ताब्यात

By सूरज.नाईकपवार | Published: January 22, 2024 05:35 PM2024-01-22T17:35:49+5:302024-01-22T17:36:55+5:30

हा मृतदेह घेउन संबधित कुटुंब उत्तर प्रदेशातील लखनै येथे रवाना झाले आहे.

Diksha was drowned in the sea and suffocated; The body is in the custody of the family | "दिक्षाला समुद्रात बुडवून गुदमरुन मारले"; मृतदेह कुटुंबीयाच्या ताब्यात

"दिक्षाला समुद्रात बुडवून गुदमरुन मारले"; मृतदेह कुटुंबीयाच्या ताब्यात

मडगाव : गौरवने आपली पत्नी दिक्षाला सुमद्राच्या पाण्यात बुडवून तिचा नाक व तोंड दाबवून तीला गुदमरुन मारुन टाकल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे. मयताच्या मृतदेहावर आज सोमवारी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात शवचिक्तसा झाली. यात मयताचा मृत्यू हा पाण्यात नाक व तोंड दाबवून गुदमरुन मारुन टाकल्याचे सिध्द झाले आहे. दरम्यान, मयताचा मृतदेह तिच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला आहे. हा मृतदेह घेउन संबधित कुटुंब उत्तर प्रदेशातील लखनै येथे रवाना झाले आहे.

१९ जानेवारी रोजी राजबाग काब द राम येथे सुमद्रकिनाऱ्यावर दिक्षा गंगावार (२७) हीचा बुडून मृत्यू झाला होता. मयताचा पती गौरव कटीयार (२९) याला या प्रकरणात नंतर कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली हाेती. आपले बाहेरख्याली संबधाचे बिग फुटेल म्हणून त्याने आपल्या पत्नीना कोलवा येथून या समुद्रकिनाऱ्यावर आणून नंतर तिला बुडवून मारुन टाकले होते. संशयित कोलवा येथील एका तीनतारांकित हॉटेलात रेस्टॉरन्ट मॅनेजर म्हणून काम करीत होता. विवाह होउन अडीच वर्षे होउनही तो आपल्या पत्नीला सोबत घेउन गोव्यात आला नव्हता. याच महिन्यात १७ जानेवारी दिक्षा गोव्यात गौरव याच्याकडे राहायला आली होती. गौरव याच्याविरोधात भादंसंच्या ३०२ कलमाखाली कुंकळ्ळी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. सदया तो पाच दिवस पोलिस कोठडीत आहेत. त्याच्या मोबाईलवरुन सदया पोलिस अधिक तपास करीत आहेत. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Diksha was drowned in the sea and suffocated; The body is in the custody of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.