अपघातग्रस्त वाहनाचा विमा नसेल तर यापुढे जप्ती किंवा थेट लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 12:45 PM2018-11-21T12:45:47+5:302018-11-21T12:46:25+5:30

वाहन अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा बळी गेला असेल किंवा शारीरिक इजा अथवा मालमत्तेची हानी झाली असेल आणि संबंधित वाहनाचा त्रयस्थ विमा उतरविलेला नसेल तर संबंधित वाहन कोर्टाला मुक्त करता येणार नाही.

direct auction if there is no accidental vehicle insurance | अपघातग्रस्त वाहनाचा विमा नसेल तर यापुढे जप्ती किंवा थेट लिलाव

अपघातग्रस्त वाहनाचा विमा नसेल तर यापुढे जप्ती किंवा थेट लिलाव

googlenewsNext

पणजी : वाहन अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा बळी गेला असेल किंवा शारीरिक इजा अथवा मालमत्तेची हानी झाली असेल आणि संबंधित वाहनाचा त्रयस्थ विमा उतरविलेला नसेल तर संबंधित वाहन कोर्टाला मुक्त करता येणार नाही. तीन महिन्यांच्या आत दस्तऐवज सादर न केल्यास हे वाहन लिलावांद्वारे  विकण्याचा अधिकारही न्यायदंडाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे.

सरकारने गोवा मोटर वाहन नियम १९९१ मध्ये दुरुस्ती करून वरील तरतूद केली आहे. या दुरुस्तीनुसार २९९ अ नियमानुसार वाहनमालकाने या वाहनासाठी त्रयस्थाचा अपघात विमा उतरविणे सक्तीचे आहे, जेणेकरून एखादेवेळी अपघात घडल्यास अपघातात सापडणाऱ्या त्रयस्थ व्यक्तीला विम्याची भरपाई मिळू शकेल. अनेक वाहनधारक केवळ वाहनाचा विमा उतरवित असत, त्रयस्थाचा विमा उतरविण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत असत. अशा वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

अपघातानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्रयस्थाच्या विम्यासंबंधी कागदपत्रांची मागणी केल्यावर वाहनधारकाने संबंधित कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांना सादर करावी लागतील. विम्याच्या दाव्याची जी रक्कम देय असेल त्यासंबंधी आवश्यक ती हमी सादर केल्यानंतर तसेच कोर्टाचे त्यावर समाधान झाले तरच वाहन मुक्त करता येईल. वाहनधारकाने त्रयस्थ व्यक्तीचा अपघाती विमा उतरविला नसेल तर किंवा तीन महिन्यात त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करण्यास वाहनमालक अपयशी ठरला असेल संबंधित वाहन लिलांवात वाढले जाईल. अपघात ज्या क्षेत्रात घडला त्या क्षेत्राच्या दंडाधिकाऱ्यांना हा अधिकार बहाल करण्यात आला आहे. वाहन विक्रीतून आलेली रक्कम १५ दिवसांत दावा लवादाकडे जमा करावी जेणेकरून त्रयस्थाला नुकसान भरपाई देता येईल, असे या नियम दुरुस्तीत म्हटले आहे.

वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार १९८८ च्या केंद्रीय मोटर वाहन कायदा कलम २६, २८, ३८, ६५, ९५, ९६, १0७, १११, १३८, १५९, १७६ व २१३ खाली बहाल करण्यात आलेल्या अधिकारानुसार ही नियम दुरुस्ती करण्यात आलेली आहे. नियमदुरुस्तीचा मसुदा जनतेच्या हरकती, सूचनांसाठी गेल्या १९ आॅक्टोबरपासून १५ दिवस खुला ठेवण्यात आला होता. परंतु कोणत्याही हरकती किंवा सूचना न आल्याने अधिसूचना काढण्यात आलेली आहे. राज्यात वाहन अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. गेल्या वर्षी २0१७ मध्ये राज्यात ३९१७ अपघातांची नोंद झाली त्यात ३0६ बळी गेले. ३५३६ अपघात वेगात वाहन हाकल्यामुळे घडले. मृतांपैकी ८२ जण २५ ते ३५ वयोगटातील तरुण होते. दरवर्षी राज्यात रस्ता अपघातांमध्ये सरासरी ३00 बळी जातात.

Web Title: direct auction if there is no accidental vehicle insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार