१ फेब्रुवारी २०२० पासून गोवा ते नागपूरसाठी थेट विमानसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 08:20 PM2019-12-21T20:20:58+5:302019-12-21T20:43:19+5:30
दाबोळी विमानतळाची जुनी टर्मिनल इमारत पाडलेल्या २० हजार चौरस मीटर जागेत नवीन टर्मिनल इमारत वाढवण्याच्या (विस्तारीकरण) कामाला लवकरच सुरवात हेणार
वास्को: गोवा - नागपूर ला थेट जोडणारी पहिली विमानसेवा १ फेब्रुवारी २०२० पासून सुरू होत असून यामुळे नागपूरहून गोव्यात येण्यासाठी तसेच गोव्यातून नागपूरला जाण्यासाठी प्रवाशाच्या वेळेत बचत होणार आहे. दाबोळी विमानतळाची जुनी टर्मिनल इमारत पाडलेल्या २० हजार चौरस मीटर जागेत नवीन टर्मिनल इमारत वाढवण्याच्या (विस्तारीकरण) कामाला लवकरच सुरवात हेणार असून काम सुरू झाल्यानंतर २१ महिन्यात ते पूर्ण होणार आहे. १४५ कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधल्यानंतर दाबोळी विमानतळावर प्रवाशांना हाताळण्याची क्षमता वर्षाला १३ दशलक्ष होणार आहे. सद्या दाबोळी टर्मिनल इमारतीची प्रवाशांची वर्षाला हाताळण्याची क्षमता ८ दशलक्ष असून येथे ९ दशलक्ष प्रवासी हाताळण्यात येत असल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.
सद्या दाबोळी विमानतळावरून नागपूर, महाराष्ट्रला जाण्यासाठी तसेच तेथून गोव्यात येण्यासाठी थेट विमानसेवा नसल्याने अनेक विमान प्रवाशांना विविध ठिकाणी होत नागपूर तसेच गोव्याला प्रवास करावा लागतो. यामुळे गोवा तसेच नागपूर येथे विमानाने प्रवास करताना प्रवाशांचा वेळ वाया जातो. १ फेब्रुवारी २०२० पासून गोवा - नागपूर येथे थेट विमानसेवा चालू होत असल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दिली असून यामुळे यामार्गावर प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. १ फेब्रुवारी पासून इंडिगो एअरलाईंन्स कडून गोवा नागपूर मार्गावर थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी देऊन यामुळे यामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दाबोळीवर प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या व प्रवासापूर्वी होणाऱ्या विविध चाचण्या इत्यादी गोष्टींना कमी वेळ लागावा यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत.
दाबोळी टर्मिनल इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी देऊन काम सुरू झाल्यानंतर २१ महीन्यात ते पूर्ण होणार असल्याचे सांगितले. २० हजार चौरस मीटर जागेत वाढवण्यात येणाऱ्या टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर सद्या देशी प्रवाशांना येथे हाताळण्याचे काम त्या बाजूत नेण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जागेत वाढ झाल्याने विमान प्रवाशांना आणखीन चांगल्या सेवा देण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे. टर्मिनल इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर दाबोळी विमानतळावर देशी - विदेशी पर्यटकांना हाताळण्याच्या क्षमतेत बरीच वाढ होणार असल्याचे ते म्हणाले. सद्याच्या टर्मिनल इमारतीची वर्षाला ८ दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असून मात्र येथे ९ दशलक्ष प्रवासी हाताळण्यात येतात असे संचालक मलिक यांनी माहितीत पुढे सांगितले. इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारत १३ दशलक्ष प्रवासी वर्षाला हाताळणार असून सदर विस्तारीकरणानंतर प्रवाशांना आणखीन चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असे ते म्हणाले.
दाबोळी विमानतळावर येणाºया प्रवाशीपैंकी ४८ टक्के प्रवासी महीला असत असून भारताली इतर विमानतळापैक्षा दाबोळी विमानतळावरील महीला प्रवासी संख्या जास्त असल्याचे मलिक यांनी सांगितले. येथे येणाºया महीला प्रवाशांची सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या तपासणीसाठी जास्त वेळ लागत असल्याचे दिसून आल्याने तपासणी सुविधेत काही बदल करण्यात आलेले असल्याची माहीती गगन मलिक यांनी दिली. महीला प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पूर्वी तीन काऊंन्टर होते, व त्यात वाढ करून चार काऊंन्टर उपलब्ध करण्यात आल्याची माहीती संचालक मलिक यांनी दिली. महीला प्रवाशांची तपासणी लवकर व्हावी तसेच तपासणीच्या वेळी त्यांना कुठल्याच प्रकारची असुविधा निर्माण न व्हावी यासाठी काही आधुनिक सुविधेंची व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली असल्याचे सांगितले.
दाबोळी विमानतळावर गोव्याची संस्कृती झळकावी याउद्देशाने विविध प्रकारची पावले उचलण्यात आलेली असून भविष्यात सुद्धा येथे गोव्याची संस्कृति जास्तित जास्त झळकावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. ख्रिस्ती बांधवांचा नाताळ तसेच नवीन वर्षाचे लवकरच आगमन होणार असून येथे येणाºया व जाणाऱ्या प्रवाशांचे याच वातावरणात स्वागत करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याची माहीती गगन मलिक यांनी दिली. दाबोळी विमानतळाचा जास्तित जास्त विकास व्हावा व येथे येणाºया प्रवाशांना जास्तित जास्त उत्तम अशा सुविधा मिळाव्या यासाठी विमानतळ प्राधिकरण सतत काम करत असून भविष्यात दाबोळी विमानतळाचा आणखीन विकास होणार असा विश्वास संचालक गगन मलिक यांनी शेवटी व्यक्त केला.