केंद्रीय अग्निशमन सेवेच्या महासंचालकांनी घेतली गोवा अग्निशमनची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 03:19 PM2023-10-29T15:19:44+5:302023-10-29T15:20:44+5:30
अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर, यांनी पुष्पगुच्छ, विभागीय स्मृतीचिन्ह, फायरमन रेस्क्यू मॉडेल सादर करुन ताज हसन यांचे स्वागत केलेआणि विभागीय उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.
नारायण गावस
पणजी: भारत सरकार गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृह रक्षकचे महासंचालक ताज हसन यांनी पणजी येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाला भेट दिली. त्यांच्या आगमनानंतर त्यांना अग्निशमन दलाचे मुख्यालयात अग्निशमन दलाच्या जवानांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर, यांनी पुष्पगुच्छ, विभागीय स्मृतीचिन्ह, फायरमन रेस्क्यू मॉडेल सादर करुन ताज हसन यांचे स्वागत केलेआणि विभागीय उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.
ताज हसन यांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांसोबत संबोधित केले त्यांनी अग्निशमन क्षेत्रातील आगामी ट्रेंडवर लक्ष केंद्रित केले आणि आग लागण्याचे एक प्रमुख कारण वीज आहे याविषीय माहिती दिले. तसेच अग्निशमन अधिकाऱ्यांनी नियामक नियमांनुसार इमारतीचे ऑडिट केले पाहिजे, असे सांगितले.
पुढे त्यांनी आपदा मित्र/आपदा सखी स्वयंसेवकांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध आपत्तींच्या काळात वापरण्यात येणाऱ्या सुधारित जीव वाचवण्याच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक केले आणि भेटीदरम्यान प्रदर्शित केलेल्या विविध अग्निशमन, आपत्कालीन आणि जीवन रक्षक उपकरणांचा आढावाही घेतला.
पुढे त्यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर, गृह मंत्रालय, भारत सरकारच्या प्रशिक्षणार्थी सब-ऑफिसरशी संवाद साधला आणि गोवा राज्य प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रातील त्यांच्या प्रशिक्षण उपक्रमांचा आढावा व अभिप्राय घेतला. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे विभागीय अधिकारी श्रीपाद गावस यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.