चार नवे रुग्ण आढळल्याने गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहचली १२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 PM2020-05-16T17:00:57+5:302020-05-16T17:01:20+5:30

लोकमतला दिलेल्या माहितीनुसार  हे सातजण वास्को येथील असून ते बाजर्संबंधी (खनिजवाहू जहाज) व्यवहार करण्यासाठी कोलकाता येथे गेले होते.

 With the discovery of four new patients, the number of corona patients in Goa has risen to 12 mac | चार नवे रुग्ण आढळल्याने गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहचली १२ वर

चार नवे रुग्ण आढळल्याने गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहचली १२ वर

Next

पणजी : गोव्यात गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या बारा झाली आहे. शनिवारी चार नवे कोरोना रुग्ण सापडले. यापैकी एकटा महाराष्ट्रातील सांगली येथील आहे तर दोघेजण गोमंतकीयच आहेत पण ते पश्चिम बंगालमध्ये जाऊन आल्याने कोरोनाग्रस्त बनल्याचे स्पष्ट झाले. या शिवाय एकटा मुळचा आग्रा येथील आहे.

गोवा हे कोरोनामुक्त राज्य असल्याचे सरकारने जाहीर केले होते. चाळीस दिवस गोव्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नव्हता पण गेल्या दोन दिवसांत कोरोनाने गोमंतकीयांची झोप उडवली. गेल्या आठवडय़ात अगोदर सात कोरोना रुग्ण सापडले होते. त्या सातपैकी सहाजण मुंबईहून आले होते. त्यानंतर विदेशातून मुंबईमार्गे आलेला एक खलाशी कोरोना पॉझिटीव्ह सापडला. तो गोमंतकीयच आहे.
शुक्रवारी कोलकाताहून सात गोमंतकीय गोव्यात परतले.

आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार  हे सातजण वास्को येथील असून ते बाजर्संबंधी (खनिजवाहू जहाज) व्यवहार करण्यासाठी कोलकाता येथे गेले होते. गोव्यात परतताच त्यांची जलदगती पद्धतीने कोरोना चाचणी केली गेली. चाचणीवेळी तिघे कोरोना पॉङिाटीव्ह आढळले. यामुळे त्यांची दुस:यांदा गोमेकॉ इस्पितळाच्या प्रयोगशाळेत चाचणी केली गेली. त्यावेळी तिघांपैकी दोघे कोरोना पॉङिाटीव्ह असल्याचे सिद्ध झाले. एकटा निगेटीव्ह आढळला. दोघांनाही मडगावच्या कोविद इस्पितळात उपचारांसाठी पाठवले गेले.

दुपारर्पयत कोरोनाचे एकूण दहा रुग्ण होते. दुपारनंतर त्यात आणखी दोघांची भर पडली. मूळ सांगली येथील एक व्यक्ती पणजीत कामत एंटरप्रायङोसला काही मालाचा पुरवठा करण्यासाठी म्हणून आपल्या वाहनाने आली होती. या वाहनात आणखी तीन व्यक्ती होत्या. एका व्यक्तीला ताप असल्याचे दिसून येताच गोमेकॉत तपासणी केली गेली. त्यावेळी 46 वर्षी व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पुणो, सावंतवाडी आदी ठिकाणी थांबून हे वाहन गोव्यात आले होते.

पणजी बसस्थानकाकडे कामत एंटरप्रायङोसला त्यांनी भेट दिली होती, असे आरोग्य मंत्री राणो यांचे म्हणणे आहे. नवी मुंबई येथून 15 रोजी सकाळी हे वाहन गोव्यात येण्यासाठी सुटले होते. याच पद्धतीने हरिद्वार येथून एका ट्रकवरून 28 वर्षीय क्लिनर आला होता. कुंडई औद्योगिक वसाहतीतील एस्सेल प्रोपेट फार्मा कंपनीसाठी काही माल घेऊन हा ट्रक आला होता. क्लिनरची फोंडा उपजिल्हा इस्पितळात जलद चाचणी केली गेली, त्यावेळी तो कोरोनाग्रस्त आढळल्याचे मंत्री राणो यांनी सांगितले. चालकाचा चाचणी अहवाल मात्र निगेटीव्ह आला. गोव्याच्या सीमेवर चालकांची नीट तपासणी होत नाही. थर्मल गनचा वापर केला तरी, काहीवेळा रुग्ण आढळून येत नाही हेही स्पष्ट झाल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.

Web Title:  With the discovery of four new patients, the number of corona patients in Goa has risen to 12 mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.