रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 06:01 PM2019-06-15T18:01:15+5:302019-06-15T18:02:02+5:30
मुख्यमंत्री गेले दोन दिवस दिल्लीत आहेत.
पणजी : गोव्याचा रेती आणि शॅक धंद्याशीनिगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच पश्चिम घाट क्षेत्राशीनिगडीत पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रबाबत (ईएसए) गोव्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी प्रकाश जावडेकर यांच्यासमोर मांडली.
मुख्यमंत्री गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री सहभागी झाले. तत्पूर्वी शुक्रवारी त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन खनिज खाण प्रश्न व म्हादई पाणी तंटाप्रश्नी चर्चा केली. केंद्रीय गृह मंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही ते भेटले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर व नवे सरकार अधिकारावर आल्यानंतर विविध केंद्रीय मंत्र्यांना स्वतंत्रपणो भेटण्याची संधी मुख्यमंत्री सावंत यांना प्रथमच मिळाली.
पश्चिम घाट क्षेत्राला जो पर्यावरणीय संवेदनक्षम भाग लागू होत आहे, त्यामुळे ब-याच खाणी सुरू होऊ शकणार नाहीतच, शिवाय विविध प्रकारचे उद्योग सुरू करण्यातही अडचणी येतील. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने यापूर्वीही गोव्याचे म्हणणो जाणून घेतलेले आहे. जावडेकर यांच्याशी मुख्यमंत्री या विषयावर नेमके काय बोलले ते कळू शकले नाही पण त्यांनी ईएसएविषयी चर्चा केली. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर गोव्यातील रेती धंद्यासमोर जी आव्हाने उभी ठाकली, त्याविषयीही मुख्यमंत्र्यांनी जावडेकर यांच्याशी चर्चा केली.
किनारपट्टीतील शॅक व्यवसायिकांच्याही काही समस्या आहेत. सीआरङोडविषयक नियमांबाबतही काही शॅक व्यवसायिक अनेकदा तक्रारी करतात. काहीवेळा समुद्राचे पाणी शॅककमध्ये घुसते व नुकसान होते. मुख्यमंत्र्यांनी जावडेकर यांना गोव्यातील पर्यावरणाशीनिगडीत विविध विषयांची व प्रश्नांची अधिक सखोलपणो कल्पना दिल्याचे सुत्रंनी सांगितले. आपण जावडेकर यांना शनिवारी भेटलो, असे जाहीर करणारे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.