प्रदुषित साळ नदी वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 07:15 PM2019-05-15T19:15:15+5:302019-05-15T19:15:23+5:30
मडगाव पालिकेकडून पहाणी : स्थानिक पंचायतींनाही उपाययोजना हाती घेण्याचा आदेश
मडगाव: गोव्यातील महत्वाची नदी असलेल्या साळ नदीतील प्रदुषणाचे स्रोत शोधून काढण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्यानंतर स्थानिक लोकसंस्थातर्फे पहाणी सुरु झाली असून याच पहाणीचा एक भाग म्हणून बुधवारी मडगाव पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या पथकाने या नदीला जोडणाऱया नाल्याची पहाणी केली. मडगाव शहरातील कित्येक नाल्यातून प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि मानवी मैला थेट साळ नदीत सोडला जात असल्याचे यावेळी उघडकीस आले.
मडगाव नगरपालिकेने एसजीपीडीए व आरोग्य खात्याच्या सहाय्याने ही पहाणी केली. साळ नदीत होणारे प्रदुषण कशाप्रकारे रोखता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ही पहाणी करण्यात आली असून साळ नदीला जोडणा:या नाल्यात ज्या घरातून व आस्थापनातून सांडपाणी सोडले जाते त्याची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिली. या पथकात नाईक यांच्यासह मडगाव पालिकेचे अभियंते मनोज आर्सेकर, उदय देसाई, राजेश देसाई, पालिका निरीक्षक हसीना बेगम तसेच डॉ. अॅनी ओलिव्हेरा यांचा समावेश होता.
वास्तविक यातील ब:याच नाल्यांची देखभाल पाटबंधारे खात्याकडून करण्यात येत असूनही या पहाणीच्यावेळी या खात्याचा तसेच सांडपाणी व्यवस्थापन महामंडळाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, हे प्रदुषण रोखण्यासाठी आरोग्य खात्याच्या सहाय्याने उपाययोजना हाती घेण्यात येणार असून या प्रदुषणाला कारणीभूत असणा:यांना लगेच नोटीसा पाठविण्यात येणार आहेत. परिस्थितीत सुधार झाला नाही तर या घरांच्या व आस्थापनांच्या पाण्याच्या जोडण्या तोडल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या नदीच्या काठावर असलेल्या पंचायतीकडूनही अशी पहाणी सुरु झाली असून मंगळवारी सासष्टीच्या गटविकास अधिकारी कार्यालयातल्या अधिका:यांनी कासावली आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी व बाणावलीचे सरपंच यांना घेऊन खारेबांद या भागाची पहाणी केली. अशाचप्रकारची पहाणी वार्का, ओडली, केळशी आणि नावेली या पंचायत क्षेत्रतही करण्यात येणार असून कोलवा आणि बेताळभाटी येथेही अशी पहाणी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
साळ नदीत मोठय़ा प्रमाणावर प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि मानवी मैला सोडला जात असल्यामुळे या नदीतील पाण्यातील बायोकेमिकल ऑक्सीजन डिमांडचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढले असून त्यामुळे कॉलिफॉर्मचे जीवाणू वाढले आहेत यामुळे ही नदी जलचर व माणसांसाठी घातक ठरल्याने हे प्रदुषण कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना हाती घेण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत.