गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रिया उद्यापासून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 05:28 PM2020-02-26T17:28:54+5:302020-02-26T17:30:27+5:30
निवडणूक आयोगाने नेमलेले निर्वाचन अधिकारी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारतील.
पणजी : राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींच्या पन्नास मतदारसंघांसाठी निवडणुकीची प्रक्रिया आज गुरुवारी सुरू होत आहे. आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आरंभ होणार आहे. 5 मार्चर्पयत अर्ज स्वीकारले जातील. सर्व पन्नास मतदारसंघांसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती आयोगाने केली आहे.
निवडणूक आयोगाने नेमलेले निर्वाचन अधिकारी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारतील. जिल्हा पंचायतींचे पन्नासपैकी तिस मतदारसंघ आरक्षित झालेले आहेत. महिला, ओबीसी, एसटी, ओबीसी महिला, एससी यांच्यासाठी हे आरक्षण आहे. 6 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. दोनशेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज सादर होतील अशी अपेक्षा आहे. इच्छुकांना उमेदवारी मागे घेण्यास दि. 7 र्पयत मुदत आहे.
निरीक्षक नियुक्त
निवडणूक आयोगाने उत्तर व दक्षिण गोव्यातील सर्व जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. गौरीश शंखवाळकर(सांकवाळ, कुठ्ठाळी), प्रशांत शिरोडकर (राय,नुवे, कोलवा, बाणावली, वेळ्ळी), संध्या कामत (दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली), दिपक देसाई (शेल्डे, बार्से), नारायण प्रभुदेसाई (रिवण), दामोदर मोरजकर (धारबांदोडा, सावर्डे), सगुण वेळीप (खोला, पैंगीण), दिपक बांदेकर (उसगाव गांजे, बेतकी खांडोळा, कुर्टी, वेलिंग प्रियोळ), जयंत तारी (कवळे, बोरी, शिरोडा), सिद्धीविनायक नाईक (हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे), उपासना माझगावकर (कोलवाळ, हळदोणा, पेन्ह द फ्रान्स, रेईश मागूश, सुकूर), मेघना शेटगावकर (कळंगुट,अंजुणा,शिरसई व शिवोली), श्रीनेथ कोठवाळे (ताळगाव, सांताक्रुझ, चिंबल, आगशी, खोर्ली), वासूदेव शेटय़े (लाटंबार्से, कारापुर सर्वण, मये व पाळी), शिवाजी देसाई (होंडा, केरी, नगरगाव) अशा पद्धतीने मतदारसंघनिहाय निरीक्षकांची नियुक्ती झाली आहे.