जिल्हा पंचायत निवडणुका 15 मार्चला; सरकारकडून अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 07:37 PM2020-01-16T19:37:04+5:302020-01-16T19:37:31+5:30
जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम येत्या 15 फेब्रुवारीर्पयत राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार आहे.
पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या एकूण 5 मतदारसंघांसाठी येत्या 15 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. पंचायत खात्याचे सचिव संजय गिहार यांनी तारीख अधिसूचित करणारी अधिसूचना गुरुवारी जारी केली. जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम येत्या 15 फेब्रुवारीर्पयत राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार आहे.
पेडणो तालुक्यातील हरमल, मोरजी, धारगळ व तोरसे मतदारसंघात निवडणूक होईल. बार्देश तालुक्यातील शिवोली, कोलवाळ, हळदोणा,शिरसई, हणजुणा, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश व पेन्ह द फ्रान्स जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडणूक होईल. अन्य तालुक्यांतील जिल्हा पंचायत मतदारसंघ पुढीलप्रमाणो- तिसवाडी- सांताक्रुझ, ताळगाव, चिंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स. डिचोली तालुका- लाटंबार्से, कारापुर सर्वण, मये, पाळी. सत्तरी- होंडा, केरी, नगरगाव. फोंडा- उसगाव गांजे, बेतकी खांडोळा, कुर्टी, वेलिंग प्रियोळ, कवळे, बोरी,शिरोडा. सासष्टी- राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली. सांगे- सावर्डे, रिवण. काणकोण- खोला, पैंगीण. मुरगाव- सांकवाळ, कुठ्ठाळी. केपे- शेल्डे, बाश्रे.
मगोप स्वबळावर लढेल : सुदिन
दरम्यान, भाजप, काँग्रेस व मगो पक्षाने आपण पक्षाच्या निशाणीवर जिल्हा पंचायत निवडणुका लढवीन हे जाहीर केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता 15 फेब्रुवारी रोजी लागू होईल. मगो पक्ष स्वबळावर जिल्हा पंचायत निवडणुका लढवील, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी गुरुवारी जाहीर केले. मगोपच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. किती जिल्हा पंचायत मतदारसंघात उमेदवार उभे करावे ते आम्ही लवकरच ठरवू. सत्तावीस विधानसभा मतदारसंघांमध्ये मगोपच्या समित्या आहेत, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष प्रथमच पक्षाच्या निशाणीवर जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवणार आहे. गोवा फॉरवर्डकडूनही निवडणूक लढवली जाईल.