जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर नको
By admin | Published: February 23, 2015 01:31 AM2015-02-23T01:31:54+5:302015-02-23T01:35:18+5:30
सावर्डे : जिल्हा निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्यासंदर्भातील कायदा रद्द करावा, कूळ व मुंडकार कायद्यात केलेली दुरुस्ती मागे घ्यावी,
सावर्डे : जिल्हा निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्यासंदर्भातील कायदा रद्द करावा, कूळ व मुंडकार कायद्यात केलेली दुरुस्ती मागे घ्यावी, तसेच जायका प्रकल्पाच्या कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे विविध ठराव सावर्डे ग्रामसभेत संमत करण्यात आले.
ही सभा सरपंच संजय नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सभागृहात झाली. या वेळी उपसरपंच उल्हास नाईक, पंच दीपक सावंत, उन्नती वडार व गटविकास कार्यालयाचे निरीक्षक सुमंत नाईक उपस्थित होते.
राज्य सरकारने कूळ व मुंडकार कायद्यांत दुरुस्ती करून बहुजन समाज, तसेच कष्टकरी समाजावर घोर अन्याय केलेला आहे. मामलेदारांकडे जाणारी प्रकरणे काढून ती न्यायालयांत वर्ग केली आहेत, हे अन्यायकारक आहे. भाटकारांच्या जागेत घरे बांधून राहात असलेल्यांवर संक्रांत येण्याची भीती निर्माण झाली आहे. परत एकदा राज्यात भाटकार शाहींचे राज्य आणण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारने कायद्यांत केलेली ही दुरुस्ती त्वरित मागे द्यावी, असा ठराव आनंद मंगेश नायक यांनी मांडला. त्याला ज्ञानेश्वर नाईक यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला.
तसेच जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याचा निर्णय योग्य नसून त्यामुळे सरकारने हा कायदा रद्द करून पूर्वीप्रमाणे निवडणुका घ्याव्यात, असा ठराव कायतान फर्नांडिस यांनी मांडला. (लो.प्र.)