जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीतर्फे २९ पदांसाठी जाहीरात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:15 PM2024-06-20T15:15:53+5:302024-06-20T15:16:41+5:30

कंत्राटी पदांसाठीची अधिसूचना गोवा राज्य ग्रामीण उपजिविका मिशन (जीएसआरएलएम) ही संस्था नोंदणीकरण कायदा १८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी, उत्तर गोवा यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.

District Rural Development Agency has advertised for 29 posts  | जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीतर्फे २९ पदांसाठी जाहीरात 

जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीतर्फे २९ पदांसाठी जाहीरात 

- नारायण गावस

पणजी : जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी मार्फत विविध कंत्राटी पदांसाठी जाहिरात आली आहे. एकुण २९ पदे भरली जाणार आहेत. ही पदे २ ते ३ वर्षे कंत्राटी तत्वावर असणार आहे. यासाठी एजन्सीने १ जुलै ते ११ जुलै या काळात थेट मुलाखती आयाेजित केल्या आहेत.
या एकुण पदामध्ये ब्लॉक प्रोग्रॅम मॅनेजर ७ पदे, ब्लॉक मॅनेजर आयबीसीबी ४ पदे, ब्लॉक मॅनेजर उपजिविका ४ पदे, ब्लॉक मॅनेजर आर्थिक समाविष्टिता ४ पदे , ब्लॉक मॅनेजर एमआयएस ६ पदे, अकाउंटंट १, कार्यालय सहाय्यक १, डेटा एन्ट्री ऑपरेटर १, ब्लॉक प्रकल्प व्यवस्थापक १ अशी एकूण २९ पदे भरली जाणार आहेत. 

कंत्राटी पदांसाठीची अधिसूचना गोवा राज्य ग्रामीण उपजिविका मिशन (जीएसआरएलएम) ही संस्था नोंदणीकरण कायदा १८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी, उत्तर गोवा यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. त्यांच्याद्वारे गोवा राज्यात राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (एनआरएलएम) राबवित आहे. या मिशनचे प्राथमिक उद्धिष्ट हे ग्रामीण स्त्रियांना स्वयंसहाय्य गटांमध्ये (एसएचजीएस) आणून प्रेरित करून दोन्ही जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील स्त्रियांना सतत उपजीविका पुरवणे आहे.

आवश्यक पात्रता, अनुभव व वय निकष यांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी  १ जुलै ते ११ जुलै या काळात दिलेल्या तारखेला थेट मुलाखतीसाठी डीआरडीए-उत्तर, स्पेसिस बिल्डिंग, ७वा मजला, पाटो, पणजी येथे यावे.  सोबत सर्व प्रमाणत पत्रे आणणे अनिवार्य आहे.

Web Title: District Rural Development Agency has advertised for 29 posts 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा