गोमंतकीयांना गृहीत धरू नये

By admin | Published: April 12, 2017 02:33 AM2017-04-12T02:33:40+5:302017-04-12T02:35:57+5:30

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना

Do not assume the Gomantakya | गोमंतकीयांना गृहीत धरू नये

गोमंतकीयांना गृहीत धरू नये

Next

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना घेऊन आंदोलन करण्याची बंजारा समाजाने जी धमकी दिली आहे ती खपवून घेणार नाही. जे लमाणी बेकायदा गोव्यात व्यवसाय चालवतात तो बंद करण्याकडे लक्ष द्यावे अन्यथा १० लाख गोवेकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा रेव्होल्युशनरी गोवन्स संस्थेतर्फे पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे.
या वेळी या संस्थेचे सदस्य नाट्यकलाकार राजदीप नाईक, आरजे पंकज कुडतरकर, मनोज परब, निगम नाईक, सूरज नाईक, राज गोवेकर, माधवी परब आदी सदस्य उपस्थित होते. या संस्थेचा कोणा एका विशिष्ट समाजावर आरोप नाही; पण जे बेकायदारीत्या गोव्यात व्यवसाय करतात, पर्यटकांना त्रास देतात त्यांच्या विरोधात ही चळवळ उभी राहिली असल्याचे राजदीप नाईक यांनी सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून ही संस्था स्थापन करण्यात आली असून फक्त सोशल मीडियावर न राहता प्रत्यक्ष आंदोलन करण्यासाठी एकत्र आल्याचे ते म्हणाले.
पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केलेल्या विधानाचे आपण समर्थन करत नसून त्यांनी आधी बिगर गोमंतकीयांची वोट बँक तयार केली आहे त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. गोव्यात येऊन हुकूमशाहीची वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. गोव्यात स्थायिक झाल्यानंतर गोमंतकीयांची आडनावे लावून नावात बदल करण्याबाबत देखील नियंत्रण आले पाहिजे, असे नाईक यांनी सांगितले.
गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही चळवळ उभी राहिली असल्याचे मनोज परब म्हणाले. आपल्या गोव्यात नीज गोंयकार लोकच दुर्मिळ होऊन बसले आहेत. बिगर गोमंतकीय येथे येतात व बेकायदा व्यवसाय चालवतात. रस्त्याच्या बाजूला नर्सरी उभारून, सिमेंट ब्लॉक्स घालून व्यवसाय करतात तसेच समुद्रकिनारी मसाज, टॅटूचे बेकायदा व्यवसाय चालवतात. उलट हेच लोक गोमंतकीयांकडे दादागिरी करतात. ते आता खपवून घेणार नाही. गोंयकारपणाचा नारा घेऊन जे सरकार स्थापन झाले आहे त्यांची देखील जबाबदारी असून गोंयकारपण टिकविण्यासाठी या विषयांकडे आधी लक्ष देणे आवश्यक असल्याचे परब म्हणाले.
या विषयावर गोवाभरातील तरुणांमध्ये जागृती केली जाईल व पुढचे पाऊल ठरविले जाणार, असे कुडतरकर यांनी सांगितले. नकारात्मक व समाजविरोधी घटक डोके वर काढत असून गोमंतकीयांनी सुशेगादपणा सोडून जागृत होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
वोट बँकेच्या नावाने बिगर गोमंतकीयांचे पालनपोषण करणे राजकीय पक्षांनी थांबवावे, असेही ते म्हणाले.
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर रशियनांनी विविध व्यवसाय उभारले असून तेथे भारतीयांना बंदी असल्याचे फलक लावले आहेत. हे कृत्य निषेधार्ह असून या विषयावर देखील आवाज उठवणार, असे राज गोवेकर म्हणाले.
गोव्यात स्थलांतरितांची संख्या वाढतच असून त्यावर नियंत्रण आले पाहिजे. यामुळे गोव्यातील महिला देखील सुरक्षित नसल्याचे माधवी परब म्हणाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Do not assume the Gomantakya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.