पक्षाची शिस्त मोडू नका!

By admin | Published: April 26, 2016 01:41 AM2016-04-26T01:41:42+5:302016-04-26T01:42:18+5:30

पणजी : पक्षाची शिस्त मोडून काँग्रेसमधील युवा कार्यकर्त्यांनी जाहीरपणे पक्षाच्या निवडणूक समितीविरुद्ध बोलू नये. ती समिती

Do not break the party's discipline! | पक्षाची शिस्त मोडू नका!

पक्षाची शिस्त मोडू नका!

Next

पणजी : पक्षाची शिस्त मोडून काँग्रेसमधील युवा कार्यकर्त्यांनी जाहीरपणे पक्षाच्या निवडणूक समितीविरुद्ध बोलू नये. ती समिती पक्षाच्या अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने म्हणजेच श्रेष्ठींनीच मंजूर केलेली आहे. युवा सदस्यांनी या समितीच्या नियुक्तीवर टीका केल्याबाबत आम्ही या सदस्यांचा निषेध करत आहोत, असे काँग्रेसचे नेते जितेंद्र देशप्रभू व अन्य पदाधिकाऱ्यांनी मिळून येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
देशप्रभू म्हणाले की, कुणीच पक्षातील विषयांबाबत थेट मीडियाकडे किंवा जाहीरपणे बोलून टीका करू नये, असे अपेक्षित आहे. तन्वीर खतीब यांना मीच काँग्रेसमध्ये आणले होते. त्यांच्याकडून अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या निर्णयावर टीकेची मला अपेक्षा नव्हती. पक्षातील एखादी गोष्ट मान्य झाली नाही, तर त्याबाबत बोलण्याची एक पद्धत आहे. प्रदेश काँग्रेस समितीच्या व्यासपीठावर त्याविषयी बोलायला हवे. प्रदेशाध्यक्षांकडे बोलायला हवे. थेट जाहीरपणे प्रसारमाध्यमांकडे जाऊन टीका करायची नसते.
 

Web Title: Do not break the party's discipline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.