लोक मरत होते तेव्हा भीती नाही वाटली? गोव्याच्या आमदारांना डीजीपींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:11 AM2019-02-05T06:11:38+5:302019-02-05T06:11:53+5:30
दर महिन्याला अपघातात ४० अपघाती मृत्य होत होते तेव्हा भिती व चिंता वाढली नाही काय ? असा खोचक प्रश्न पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी रस्ता सुरक्षा संबंधी आयोजित कार्यक्रमात बोलाना विचारला.
पणजी - दर महिन्याला अपघातात ४० अपघाती मृत्य होत होते तेव्हा भिती व चिंता वाढली नाही काय ? असा खोचक प्रश्न पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी रस्ता सुरक्षा संबंधी आयोजित कार्यक्रमात बोलाना विचारला. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सेन्टीनल योजनेच्या विरोधात गोवा विधानसभेत लक्ष्यवेधी सूचना मांडली होती. या पार्श्वभुमीवर डीजीपींनी हा टोला हाणून सेन्टीनल योजनेचे जोरदार समर्थन केले.
डीजीपी म्हणाले, ‘सेन्टीनल योजनेमुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. आठवड्यात पाच अपघाती मृत्यु जेव्हा होतात तेव्हा या पाच कुटुंबावर कोणता प्रसंग बेतलेला असतो याची कल्पना करा. या ५ जणात कधी आपला मित्र किंवा कुटुंबियही असू शकतो हे लक्षात असू द्या. वाहतूक नियमाचे पालन करून घेतले म्हणून भिती व चिंता पसरत नाही तर या नियमाचे उल्लंघन होते तेव्हा भिती व चिंता करण्यासारखी परिस्थिती असते’.
तर विधानसभेत ठराव घ्यावा
गोव्यातील लोकांची डोकी लोखंडाची आहेत आणि त्यांना दुचाकी चालविताना हेल्मेटची गरज नाहीत असे गोव्यातील लोकांना पक्की खात्री असेल तर तसा ठराव घ्यावा. नगर पालिकेत नाही तर गोवा विधानसभेत ठराव घ्यावा. जेणेकरून हेल्मेटची सक्ती कुठेही केली जाणार नाही असे डीजीपी मुक्तेश चंदर यांनी सांगितले.