चिंता करू नका, हॉलिवूड भारतातच येणार - अनिल कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 10:14 PM2018-11-27T22:14:04+5:302018-11-27T22:14:34+5:30

सिनेमा निर्मितीत भारत नेहमीच पुढे राहिला आहे. येणाºया १0५ वर्षांत भारतीय सिनेमांचे जगभरात कौतुक होईल. आताही होते आहे.

Do not worry, Hollywood will come to India - Anil Kapoor | चिंता करू नका, हॉलिवूड भारतातच येणार - अनिल कपूर

चिंता करू नका, हॉलिवूड भारतातच येणार - अनिल कपूर

Next

- संदीप आडनाईक 

पणजी - सिनेमा निर्मितीत भारत नेहमीच पुढे राहिला आहे. येणा-या १0५ वर्षांत भारतीय सिनेमांचे जगभरात कौतुक होईल. आताही होते आहे. चिंता करू नका, येणाºया काळात हॉलिवूड येथेच निर्माण होईल, याची खात्री बाळगा असा आत्मविश्वास अभिनेता अनिल कपूरनेइफ्फीत आलेल्या तरुण सिनेमा निर्मात्यांना दिला.

गोव्यात सुरू असलेल्या ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मास्टर क्लास वुईथ मि. इंडिया’ या सत्रात अभिनेता अनिल कपूरची मुलाखत त्यांची कन्या रिया कपूर हिने घेतली. आपल्या ३८ वर्षांच्या सिनेमा कारकिर्दीचा इतिहास या मुलाखतीतून उलगडला. पुण्यातील एफटीआयआयसारख्या संस्थेतून अनेक कलाकार तयार झाले. मीही त्यातूनच तयार झालेला अभिनेता आहे, असे सांगून मी सिनेमासाठी काम शोधत गेलो नाही, उलट त्या भूमिकांसाठी माझा शोध घेतला गेला. कॅमेऱ्यायाला सामोरे जाण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी इंडस्ट्रीचा आभारी आहे. 

तुम्ही नशिबावर सर्वकाळ हवाला ठेवू शकत नाही, मेहनत ही घ्यावीच लागेल. तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही तुमचे नशीब घडवू शकता, असा आत्मविश्वास अनिल कपूरने उपस्थित इफ्फी प्रतिनिधींना दिला. दुसºया एका प्रश्नाला उत्तर देताना अनिल कपूर म्हणाला, मी सदैव अपयशाला सामोरा गेलो, म्हणून मी कधीच खचलो नाही. लोक माझ्या अपयशाबद्दल बोलतात तेव्हा मी त्यांना फक्त इट्स ओके म्हणतो आणि पुढच्या सिनेमाच्या कामासाठी लागतो. माझे मित्रही मला त्यांच्या फ्लॉपनंतर निराश होतात तेव्हा फोन करतात आणि मी त्यांना बरे झाले, असे सांगून पुढच्या कामासाठी प्रोत्साहन देतो. कधी कधी स्वत:च्या लूकवर मेहनत घ्या, अन्यथा या इंडस्ट्रीतील लोक, लेखक, दिग्दर्शक आणि प्रेक्षकही तुम्हाला विसरू शकतात. तुम्ही फिट राहा, आनंदी राहा हाच तुमच्या यशाचा फॉर्म्युला आहे. मी आजही मॅरेथॉनमध्ये भाग घेतो. मी कामाला प्राधान्य देतो, अपयशानंतर मी चांगल्या दिग्दर्शकासोबत काम केले, मी अधिक चुझी झालो असे सांगून अनिल कपूरने त्याच्या टपोरी स्टाइलमध्ये कुत्ते के माफिक काम करो, असा सल्ला दिला. सोनमबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाला, की कामाच्या बाबतीत ती माझीच गुड कॉपी आहे. घरातील लोक तुमच्या अपयशात तुम्हाला सांभाळतात. पूर्वी सायकॅट्रिस्ट नव्हते, आता आहेत; परंतु तुमचे हितचिंतकच तुमचे सायकॅट्रिस्ट आहेत. तुम्ही यशाच्या शिखरावर असा की अपयशामुळे खचलेला असा, तुम्हाला तुमचे जवळचेच सांभाळतात, असे तो म्हणाला.

रिया कपूर म्हणते, माझे वडिल सर्वात हॉट

अनिल कपूर यांची कन्या रिया कपूर हिने मुलाखत घेताना तिच्या मैत्रिणींचे तिला आलेले मेसेज वाचून दाखविले. तिच्या मैत्रिणीनी तुझे वडील अजूनही हॉट आहेत असे मेसेज पाठविल्याचे रियाने सांगितले. सिनेमामुळे मला अनेक संधी मिळाल्याचे रिया कपूरने सांगितले. भविष्यात इंटिरियर डिझायनिंग, स्क्रीप्ट रायटिंग यासारख्या अनेक संधी मिळतील. मी एकदाच अभिनय करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या बहिणीइतके सोनमइतमे मला काम जमले नाही. यासाठी माझ्या मॉमवर मी गेले आहे. मला खायला खूप आवडते, वडिलांना अनेकदा ते आवडत नाही, पण कदाचीत मी एखादे रेस्टॉरंटही सुरु करेन, असे रियाने सांगितले

मि. इंडिया पुन्हा करायला आवडेल : अनिल कपूर

मि. इंडियासारखा सुपर हिरो हिंदी सिनेमात झालेला नाही. पुन्हा करायला आवडेल काय या प्रश्नाला उत्तर देताना अनिल कपूरने सांगितले, की हॉलिवूडमध्ये अनेक सुपर हिरो झाले. आपल्याकडेही प्रयत्न झाला. पण मि. इंडियासारखा सुपर हिरोवर आधारित सिनेमा पुन्हा तयार होणार असेल तर तो करायला मला आवडेल, तुम्हीच संधी घ्या अशा शब्दात प्रश्नकर्त्याला प्रोत्साहन देत अनिल कपूरने  टाळ्या मिळविल्या.

नायक सिनेमात मुख्यमंत्री होतो, आता पंतप्रधान होईन

नायक सिनेमात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो. संधी मिळाली तर एक दिवसाचा पंतप्रधानही होईन असे उत्तर अनिल कपूरने देताच टाळ्यांचा कडकडाट झाला. थ्री इडियटससारख्या सिनेमातून पालकांनी विचार घ्यावा, मुलांना त्यांना हवे ते करु द्यावे असे सांगून माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी भाषण देणार नाही, कारण मी मनोरंजन करतो, परंतु भूतानसारख्या देशातील सर्वजण आनंदी आहेत. मी एक दिवसाचा पंतप्रधान झालो तर भारतातील सर्व लोक आनंदी असतील असे पाहीन, असे एका प्रश्नाला उत्तर देताना अनिल कपूर म्हणाला. 

Web Title: Do not worry, Hollywood will come to India - Anil Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.