वडिलांकडून मुलाला किडनी दान; गोमेकॉत यशस्वी शस्त्रक्रिया
By वासुदेव.पागी | Published: July 2, 2024 04:21 PM2024-07-02T16:21:04+5:302024-07-02T16:21:17+5:30
सोमदत्त गावकर असे या वीस वर्षीय युवकाचे नाव आहे.
पणजी : मूत्रपिंड खराब झालेल्या एका वीस वर्षीय युवकाला त्याच्या वडिलांनी मूत्रपिंड दान केले. यासंबंधी शस्त्रक्रिया गोवा वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वीपणे करण्यात आले. ही शस्त्रक्रिया शनिवारी झाली.
सोमदत्त गावकर असे या वीस वर्षीय युवकाचे नाव आहे. त्याचे वडील श्रीकांत गावकर यांच्याकडून स्वतःचे एक मुत्रपिंड दान करण्यात आले. राज्य अवयव व टिशू रोपण समितीच्या परवानगीनंतर या दोन्ही शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर मधुमोहन प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. गोमेकोत यापूर्वीही मूत्रपिंड रोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी या शस्त्रक्रियेबद्दल त्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या पथकाचे कौतुक केले आहे.