डिसोझांकडे मुख्यमंत्रिपदाचा ताबा देणे टाळले
By admin | Published: May 19, 2015 01:28 AM2015-05-19T01:28:19+5:302015-05-19T01:28:29+5:30
पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे अज्ञातस्थळी रवाना झाले असून ते शनिवारी सकाळी गोव्यात परतणार आहेत. सोमवार ते
पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे अज्ञातस्थळी रवाना झाले असून ते शनिवारी सकाळी गोव्यात परतणार आहेत. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस पार्सेकर हे गोव्यात नसले तरी, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा ताबा मात्र उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे दिलेला नाही. यामुळे मंत्रिमंडळातही आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस मुख्यमंत्र्यांसाठी ज्या फाईल्स येतील त्या तशाच निर्णयावीना राहणार आहेत. एरव्ही पाच दिवस जेव्हा मुख्यमंत्री गोव्याबाहेर असतात, तेव्हा मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता ताबा हा उपमुख्यमंत्र्यांकडे देणे सोयीचे असते. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्रिपदी असताना गोव्याबाहेर पाच-सहा दिवस राहायचे त्या वेळी फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे ते ताबा सोपवून जात होते. मात्र, या वेळी पार्सेकर यांनी(पान २ वर)