क्रीश दुबईला पळाल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 02:15 AM2015-05-11T02:15:27+5:302015-05-11T02:15:45+5:30

मायणातील बर्थ-डे पार्टीत अमली पदार्थाचा पुरवठा करणारा क्रीश परेरा हा दुबईला पळाल्याची शक्यता आहे. मायणा-कुडतरी पोलीस या

Doubts about Krystal running for Dubai | क्रीश दुबईला पळाल्याचा संशय

क्रीश दुबईला पळाल्याचा संशय

Next

सूरज पवार ल्ल मडगाव
मायणातील बर्थ-डे पार्टीत अमली पदार्थाचा पुरवठा करणारा क्रीश परेरा हा दुबईला पळाल्याची शक्यता आहे. मायणा-कुडतरी पोलीस या क्रीशसह मॅथ्यू कुलासो याच्याही शोधात आहेत. २३ दिवस लोटून गेले तरी हे दोघे संशयित पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाही. या दोघांविरुध्द आता लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
क्रीशकडे पासपोर्ट असून, घटना घडल्यानंतर त्याने आखातात पळ काढल्याचा संशय आहे. त्याच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट असावा, असाही पोलिसांचा कयास आहे. सध्या पोलीस या प्रकरणी चौकशीला लागले आहेत. क्रीशविरुध्द रेड कॉर्नर नोटीसही जारी केली जाण्याची शक्यता आहे. फरार मॅथ्यू हा गोव्याबाहेर दडी मारून असावा, असा पोलिसांचा संशय आहे. आतापर्यंत या प्रकरणात १६ जणांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. पार्टीत उपस्थित यातील काही साक्षीदारांची आता १६४ कलमाअंतर्गत स्वेच्छा कबुली जबानी नोंदवून घेतली जाणार आहे.
गेल्या १८ एप्रिल रोजी मायणा येथे एका पार्टीत पराज रायकर व रोडसन मोन्तेरो या दोघा युवकांचा मृत्यू झाला होता. एलिस्टन डिमेलो याच्या २0 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित बर्थ-डे पार्टीत ही घटना घडली होती. वरकरणी ही बर्थ-डे पार्टी असली तरी ती चक्क अ‍ॅसिड पार्टी होती, असा पोलिसांचा दावा आहे. या पार्टीत अमली पदार्थांची रेलचेल होती. त्यात एलएसडी व गांजाही उपलब्ध होता. मॅथ्यू व क्रीश या दोघानेच हे अमली पदार्थ आणले होते. तशी जबानी या पार्टीचे आयोजक एलिस्टन याने यापूर्वीच पोलिसांना दिलेली आहे.
पराज रायकर व रॉडसन मोन्तेरो या दोघांचा मृत्यू पार्टीत ड्रग्सच्या अतिसेवनामुळेच झाला असावा, असा संशय आहे. शवचिकित्सेनंतर मयतांचे व्हिसेरा रासायनिक पृथकरणासाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवून देण्यात आले आहे. त्याचा अहवाल अजूनही येणे आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मायणा येथील पार्टीत या दोन युवकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करताना एलिस्टनला ताब्यात घेऊन मागाहून अटक केली होती. भादंसंच्या ३0४ कलमाखाली, तसेच अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याच्या २0 (ब),(अ) व २७ व २९ कलमांखाली त्याच्यावर गुन्हा नोंद केला होता, मॅथ्यू व क्रीशवरही पोलिसांनी याच कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
मायणातील घटना घडल्यानंतर पोलिसांनी एलिस्टन व मॅथ्यूवर गुन्हे नोंद केले होते. मात्र, क्रीशबाबत कमालीची गुप्तता राखली होती. उत्तर गोव्यात अमली पदार्थाचे मोठे नेटवर्क आहे. क्रीश या भागात कामाला असल्याने त्याचे तेथील ड्रग्स पेडलरशीही संबंध असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. फेसबुकमध्ये एलिस्टनच्या मित्रांच्या यादीत क्रीश आहे. या दोघांचे वडील आखातात असल्यामुळे त्यांना पैशाची कधी चणचण नव्हती. या दोघांनाही अमली पदार्थ सेवनाचे व्यसन असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Doubts about Krystal running for Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.