डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन लवकरच हाेणार : मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 05:13 PM2023-12-17T17:13:12+5:302023-12-17T17:13:21+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हे लवकरच गाेव्यात हाेणार असून त्याला फक़्त एक इमारत म्हणून न पाहता ते मंदिर म्हणून पाहावे.

Dr. Babasaheb Ambedkar Bhavan will be constructed soon: Information of Minister Subhash Paldesai | डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन लवकरच हाेणार : मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन लवकरच हाेणार : मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

नारायण गावस 

पणजी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हे लवकरच गाेव्यात हाेणार असून त्याला फक़्त एक इमारत म्हणून न पाहता ते मंदिर म्हणून पाहावे. त्या ठिकाणी गेल्यावर सर्वांना ज्ञानाची उर्जा यावी, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले. अखिल गोवा दलित महासंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर अनुसुचित जाती जमातीचे आयुक्त दिपक करमलकर, अखिल गोवा दलित महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम परवार तसेच इतर सदस्य उपस्थित होते.मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, आंबेडकर भवन हे लवकरच हाेणार असून यासाठी सरकारतर्फे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. हे भवन झाल्यावर यात सर्व प्रकारचे कार्यक्रम सेवा उपलब्ध हाेणार आहे. याला फक़्त आम्ही एक इमारत म्हणून न पाहता बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणास्थान म्हणून पाहावे. तसेच गरजू सर्व लाेकांच्या समस्या सोडविण्यासाठी या भवनाचा उपयोग केला पाहिजे. यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पहिजे.

मंत्री फळदेसाई पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहीली त्यात काहीच बदल न करता त्याचे पालन केले जात आहे. यावरून दिसून येते बाबासाहेब आंबेडकरांचे १० टक्के गुण जरी आपण आत्मसात केले तर आपण आपले नाव माेठे करु शकतो. तसेच राज्यासाठी देशासाठी चांगले कार्य शकतो. आम्ही फक्त जातीवर वादविवाद न करता देशासाठी एकत्र आलाे पाहिजे. आम्ही सर्व भारतीय आहोत. जात ही आमची दुसरी ओळख असली तरी आपण जाती धर्मावरुन कधीच भेदभाव करु नये. डॉ. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करुन आमच्या पुढील पिढीने चांगले उपक्रम केले पाहीजे.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Bhavan will be constructed soon: Information of Minister Subhash Paldesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा