नशेत मर्सिडीसने तिघांना उडविणारा तुरुंगातच; पोलिसांच्या रणनीतीमुळे कोठडीत वाढ

By वासुदेव.पागी | Published: August 17, 2023 05:02 PM2023-08-17T17:02:35+5:302023-08-17T17:03:45+5:30

... त्यामुळे परेश अटकेत असलेला सिनाय सावर्डेकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवार दि.२१ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. 

Drunk Mercedes driver in jail Increase in custody due to police tactics | नशेत मर्सिडीसने तिघांना उडविणारा तुरुंगातच; पोलिसांच्या रणनीतीमुळे कोठडीत वाढ

नशेत मर्सिडीसने तिघांना उडविणारा तुरुंगातच; पोलिसांच्या रणनीतीमुळे कोठडीत वाढ

googlenewsNext

पणजी : बाणस्तरी अपघात प्रकरण म्हार्दोळ पोलिसांकडून काढून घेऊन क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात येत असल्याचे निवेदन राज्याचे सरकारी अतिरिक्त अभियोकक्ते प्रवीण फळदेसाई यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात केले. त्यामुळे परेश अटकेत असलेला सिनाय सावर्डेकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवार दि.२१ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. 

म्हार्दोळ पोलिसांनी अटक केल्यानंतर परेशने जामीनसाठी फोंडा सत्र न्यायालयात धाव घेतली होती, परंतु सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे त्याने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती. ११ ऑगस्ट रोजी खंडपीठात याचिका सादर करताना ‘तातडीने सुनावणी घ्यावी’ अशी मागणी त्याने केली होती. परंतु न्यायालयाने सुनावणीची तारीख ही १७ ऑगस्ट ठेवण्यात आली. आज जेव्हा न्यायालयात हे प्रकरण सुनावणीस आले तेव्हा प्रोसिक्युशनने वेगळीच रणनीती स्विकारताना हे प्रकरण म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात येत असल्याचे न्यायालाला सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील सुनावणी न्यायालयाला स्थगित ठेवावी लागली. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सोमवारी क्राईमब्रँच परेशच्या जामीन याचिकेवर आपले म्हणणे न्यायालयात स्पष्ट करणार आहे.
 
बुधवारी या अपघत पीडितांच्या दिवाडी येथील कुटुंबियांनी आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेऊन म्हार्दोळ पोलिसांच्या तपासाबद्दल असमाधान व्यक्त केले होते. हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

६ ऑगस्ट रोजी बाणस्तरी येथे दारुच्या नशेत भरधाव वेगात मर्सीडीस कार चालवून परेशने ६ वाहनांना ठोकर दिली होती. या अपघातात तिघांचा मृत्यु तर तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. मर्सीडीसमध्ये दारुच्या बाटल्याही सापडल्या होत्या. परेशची पत्नी मेघना सावर्डेकरही त्याच्या बरोबर यावेळी कारमध्ये होती. तिलाही अटक करण्याची मागणी स्थानिकांनी करून पोलीसस्थानकावर मोर्चा नेला होता. मात्र मेघना हिने फोंडा स त्र न्यायालयाकडून अंतरीम अटकपूर्व जामीन मिळविला असून २३ रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. 

मेघनाच्या याचिकामागून याचिका
पोलिसांच्या तपासाला सहकार्य न देण्याचा निर्धार केलेल्या मेघना हिने म्हार्दोळ पोलिसांचा एकही समन्स जुमानला नाही. आता उच्च न्यायालयातही तिने पोलिसांच्या समन्सना आव्हान दिले आहे. आरोग्याच्या कारणामुळे पोलीस स्थानकात जाऊन जबानी देऊ शकत नसल्याचे तिने यािकेत म्हटले आहे.
 

Web Title: Drunk Mercedes driver in jail Increase in custody due to police tactics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.