जीव धोक्यात घालून बोरीतील धबधब्यावर मद्यपी तरुणांची मौजमजा

By आप्पा बुवा | Published: July 28, 2023 05:49 PM2023-07-28T17:49:40+5:302023-07-28T17:49:52+5:30

धबधब्यावर येणारे युवक दारूच्या बाटल्या परिसरात टाकत असल्याने अनेक ठिकाणी काचांचा खच पडला आहे.

Drunken youths have fun on the waterfall in the sack risking their lives | जीव धोक्यात घालून बोरीतील धबधब्यावर मद्यपी तरुणांची मौजमजा

जीव धोक्यात घालून बोरीतील धबधब्यावर मद्यपी तरुणांची मौजमजा

googlenewsNext

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गोव्यातील धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी पडत असल्याने सदर धबधबावर बंदी असतानाही काही युवक मात्र जीव धोक्यात घालून मौज मजा करत असल्याचे दृश्य नजरेस पडत आहे जोपर्यंत कोणतेही अनुसूचित घटना घडत नाही तोपर्यंत सर्व अलबेला आहे परंतु दुर्दैवाने काही अनुचित प्रकार घडल्यास मात्र सरकारवर मोडण्यासाठी लोक पुढे येतील तेव्हा प्रशासनाने सदर धबधबा वर लक्ष ठेवावे अशी मागणी होत आहे. अभयारण्यातील धबधब्यांवर बंदी घालतानाच अन्य ठिकाणी धबधब्यांवर जाताना दारू पिऊन पाण्यात उतरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. पण या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावत शिरशिरे-बोरी येथील धबधब्यावर काही लोक व खास करून युवक गर्दी करत आहत. काही तरुण दारूच्या नशेत धिंगाणा घालत आहे. विशेष म्हणजे, त्यांना आवर घालण्यासाठी या ठिकाणी कोणीही सुरक्षा कर्मचारी नाही.

गेल्या सहा महिन्यांत ३८ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर सरकारने अभयारण्य क्षेत्रातील आणि धोकादायक ठिकाणच्या धबधब्यांवर, असुरक्षित चिरेखाणींवर आणि समुद्र किनाऱ्यांवर जाण्यावर बंदी घातली आहे. पण परंतु मौज मजेची सवय लागलेल्या लोकांना अशा ठिकाणी जाण्याचा मोह आवरता येत नसल्याचे दिसत आहे. असाच प्रकार शिरशिरे-बोरी येथील धबधब्यावर दिसत आहे. या धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची व लोकाची  गर्दी वाढली आहे. खास करून शनिवार रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी येथे चांगलीच गर्दी असते. विशेष म्हणजे, या ठिकाणी युवा वर्ग दारूच्या नशेत धिंगाणा घालताना दिसून येतात. पोलिसांनी परिसरात गस्त घालून जाणाऱ्या युवकावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील लोक करीत आहे.

धबधब्यावर येणारे युवक दारूच्या बाटल्या परिसरात टाकत असल्याने अनेक ठिकाणी काचांचा खच पडला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कचरा सुद्धा पाण्यात टाकण्यात येत आहे. दारूच्या नशेत येथे कायम भांडण तंटे सुद्धा होत असतात. धबधब्यावर यापूर्वी दोन गटांत भांडण झाले होते व प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत गेले होते.

काही वर्षांपूर्वी बोरी परिसरात खडी काढण्याचे काम सुरू होते. मात्र, काही कारणांनी खडी काढण्याचे काम बंद झाल्याने डोंगराळ भागातील पाणी खाडीच्या खाणीत वाहून येते. पाणी उंच भागातून खाली येत असल्याने पावसाळ्यात येथे धबधबा तयार होतो. याच धबधब्यावर प्रेमी युगुले अधिक प्रमाणात दिसून येतात. विविध ठिकाणांहून येणारे युवक मुख्य रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेला धबधबा गाठत असतात. दारूच्या नशेत याठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिक लोक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी दररोज परिसरात गस्त घालण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहे.

Web Title: Drunken youths have fun on the waterfall in the sack risking their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा