दाट धुक्यामुळे गोव्यात येणारी पाच विमाने अन्यत्र उतरविली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 06:38 PM2018-02-23T18:38:18+5:302018-02-23T18:38:18+5:30

शुक्रवारी पहाटे पडलेल्या दाट धुक्याचा परिणाम राज्यातील विमान वाहतूक सेवेवर झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रत दाबोळीला येणारी दोन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत तीन विमानांना इतर राज्यांतील विमानतळावर उतरावे लागले. 

Due to the fog, five aircrafts in Goa were taken out elsewhere | दाट धुक्यामुळे गोव्यात येणारी पाच विमाने अन्यत्र उतरविली

दाट धुक्यामुळे गोव्यात येणारी पाच विमाने अन्यत्र उतरविली

Next

पणजी : शुक्रवारी पहाटे पडलेल्या दाट धुक्याचा परिणाम राज्यातील विमान वाहतूक सेवेवर झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रात दाबोळीला येणारी दोन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत तीन विमानांना इतर राज्यांतील विमानतळावर उतरावे लागले. 

दाबोळी विमानतळावर पहाटे सहा वाजता दवामुळे काहीही दिसत नव्हते, विमानतळापासून 30 किलोमीटर अंतरावर दाट धुक्याचे आच्छादन पसरले होते, त्याचा परिणाम या विमान वाहतूक सेवेवर झाल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले.

रशियामधून आलेले विमान बंगळुरूकडे, तर मँचेस्टरहून (युके) आलेले विमान मुंबई विमानतळाकडे वळविण्यात आले. देशांतर्गत विमानसेवा देणा-या इंडिगोचे चेन्नई ते गोवा हे विमान बंगळुरूकडे वळविले होते. तसेच गोएअरचे एअरक्राफ्ट हे पुन्हा मुंबईत पाठविण्यात आले. स्पाईसजेटचे विमान चेन्नई ते गोवा हेसुद्धा पुन्हा बंगळुरूला थांबविण्यात आले.

सकाळी साडेवाठ वाजता वातावरण पूर्णपणे निवाळल्यानंतर विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्याचे प्राधिकरणाने सांगितले. 

Web Title: Due to the fog, five aircrafts in Goa were taken out elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.