गांजा, चरस सोडून गोव्यातील अमली पदार्थ विक्रेते वळू लागले हेरॉईनकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 08:31 PM2017-10-03T20:31:16+5:302017-10-03T20:31:37+5:30

गोव्यातील पर्यटन हंगाम सुरु होण्यापूर्वी गांजा व चरस या सारख्या अमली पदार्थाची विक्री करणारे व्यवसायीक आता हळूहळू हेरॉईन सारख्या अमली पदार्थाच्या विक्रीकडे वळू लागले आहेत. राज्यात येणा-या विदेशी पर्यटकांवर डोळा ठेऊन ही विक्री होऊ लागली आहे.

Due to Ganja, Charas, goat pharmacy sellers started turning bullion | गांजा, चरस सोडून गोव्यातील अमली पदार्थ विक्रेते वळू लागले हेरॉईनकडे

गांजा, चरस सोडून गोव्यातील अमली पदार्थ विक्रेते वळू लागले हेरॉईनकडे

Next

म्हापसा -  गोव्यातील पर्यटन हंगाम सुरु होण्यापूर्वी गांजा व चरस या सारख्या अमली पदार्थाची विक्री करणारे व्यवसायीक आता हळूहळू हेरॉईन सारख्या अमली पदार्थाच्या विक्रीकडे वळू लागले आहेत. राज्यात येणा-या विदेशी पर्यटकांवर डोळा ठेऊन ही विक्री होऊ लागली आहे. मागील दोन दिवसात अमली पदार्थ विरोधात कळंगुट पोलिसांनी सुरु केलेल्या मोहिमेवरुन हे स्पष्ट झाले आहे. अमली पदार्था विरोधात मोहिम तिव्र करताना दोन दिवसात कळंगुट पोलिसांनी दुसरी कारवाई करून  केरळातील नगरिकाकडून ४० हजार किंमतीचा गांजा व हेरॉईन जप्त केले. मागील दोन दिवसात केलेल्या कारवाईत तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघाही संशयीताकडून हेरॉईन जाप्त प्रमाणावर जप्त करण्यात आले आहे.

मुंजेश्वरम केरळ येथील अब्दुल हनेसार सवाज या २३ वर्षीय युवकाकडून पोलिसांनी २७० ग्रॅम वजनाचा ३० हजार रुपये किंमतीचा गांजा तसेच ५ ग्रॅम वजनाचे १० हजार रुपये किंमतीचे हेरॉईन ताब्यात घेतले आहे. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ४० हजार रुपये होत असल्याची माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. 

मूळ केरळ येथील अब्दुल हनेसार सवाज अमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध होताच त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. कळंगुट किना-यावरील पार्किंग क्षेत्रात ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना त्याला पकडण्यात आले. मंगळवारी पहाटे ३ ते ५ दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे दळवी यांनी सांगितले. 

अमली पदार्थांसोबत त्याच्याकडून मोबाईल तसेच नगद रुपये सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहेत. अमली पदार्थाच्या विविध कलमाखाली त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. पर्यटन हंगामा सुरु झाल्यानंतर मागील दोन दिवसात कळंगुट पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई असून सोमवारी केलेल्या कारवाई दोघा स्थानिकांना अटक केली होती. त्यांच्याकडून ६० हजार रुपये किंमतीचे हेरॉईन, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले होते.  निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऋषीकेश पाटील, हवालदार दिनेश मोरजकर, गोविंद शिरोडकर, प्रितेश किनळकर यांनी ही कारवाई केली. 

Web Title: Due to Ganja, Charas, goat pharmacy sellers started turning bullion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.