सामुदायिक शेतीमुळे यंदा भाताचे उत्पादन वाढणार; कृषी संचालकांनी व्यक्त केला अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 04:41 PM2024-05-29T16:41:21+5:302024-05-29T16:41:56+5:30
कृषी खात्याकडून सामुदायिक शेतीसाठी ९० टक्के अनुदान सुरु केल्याने मागील काही वर्षापासून सामुदायिक शेतीचे प्रमाण वाढले आहे.
नारायण गावस, पणजी: राज्यात कृषी खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या सामुदायिक शेती या उपक्रमामुळे यंदाच्या वर्षी भात शेतीच्या लागवडीत वाढ हाेण्याची शक्यता कृषी खात्याचे संचालक नेव्हील अफान्सो यांनी व्यक्त केली आहे. कृषी खात्याकडून सामुदायिक शेतीसाठी ९० टक्के अनुदान सुरु केल्याने मागील काही वर्षापासून सामुदायिक शेतीचे प्रमाण वाढले आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात सामुदायिक शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी कृषी खात्याकडे अनेक अर्ज येत आहे.
सचालाक अफान्सो म्हणाले, राज्यात भात शेतीची लागवड वाढविली तसेच अनेक शेतकरी शेतीकडे वळावे यासाठी कृषी खात्यातर्फे सामुदायिक शेती हा उपक्रम सुरु केला आहे. किमान १० पेक्षा जास्त शेतकरी एकत्र येऊन ही शेती करु शकतात. यात भात शेतीची लागवड केली जात आहे. या शेतकऱ्यांना कृषी खात्याकडून भात तसेच अन्य शेतीसाठी लागणारे इतर उपकरणावर ७० ते ९० टक्के अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही शेती करताना काहीच नुकसान होत नाही. तसेच उत्पादनही जास्त प्रमाणात मिळते आता मान्सून पावसाला सुरुवात होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी खास शेती करण्यासाठी अर्ज केले आहेत.
संचालक नेविल अफान्सो म्हणाले, कृषी खात्याकडे शेतकऱ्यांना यंदा भात शेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. काही वर्षापूर्वी भात शेतीची लागवड कमी झाली हाेती. पण आता त्याला कृषी खात्याने पुर्नजीवीत केले असून जास्तीत जास्त शेतकरी भात शेतीकडे वळतात. यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य सुरु केले आहे. शेतकऱ्यांना नांगरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर, भात बियाणे, खत या सर्वांवर ७० ते ९० टक्के अनुदानात दिले जात आहे. यंदाच्या वर्षी भात शेतीची लागवड वाढण्याची शक्यता आहे.