पाणी नदीत जाण्यास वाट नसल्यानेच पूरस्थिती, उपाययोजनांवर भर
By समीर नाईक | Published: July 11, 2024 03:27 PM2024-07-11T15:27:14+5:302024-07-11T15:29:54+5:30
मेरशी, सांताक्रूझ बांध येथे पावसाळ्यात पाणी साचले होते, त्या अनुषंगाने या संपुर्ण भागाची पाहणी करण्यात आली. गे
पणजी: मेरशी, सांताक्रूझ बांध येथे पावसाळ्यात पाणी साचले होते, त्या अनुषंगाने या संपुर्ण भागाची पाहणी करण्यात आली. गेल्या काही वर्षात आमच्या मतदारसंघात अनेक महामार्ग झालेत, यादरम्यान अनेक लहानमोठे गटारे बुजविण्यात आले. तर अनेक वाहिन्या देखील तुंबले होते, असे लक्षात आले. त्यानुसार त्वरित येथे गटारांची व वाहिनिंची स्वच्छता हातात घेण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार रुडोल्फ फर्नांडीस यांनी दिली.
शेताच्या बाजूलाच महामार्ग आल्याने अनेक समस्या तयार झाल्या आहेत. आमच्या भागात अनेक तळे व मानस आहेत. पूर्वी जेव्हा पावसात जेव्हा ही तळे व मानस किंवा शेत भरायचे तेव्हा ते पाणी नदीत मिसळायचे, आता पाणी नदीत मिसळायला वाट शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे हे पाणी रस्त्यावर सचिन राहते. आता पाऊस कमी असल्याने पाणी ओसरले असल्याने सध्या स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.
राज्यात काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यापैकी एक प्रभावित भाग म्हणजे सांताक्रूझ मतदारसंघ. या पावसात सांताक्रूझ मतदारसंघातील मेरशी, सांताक्रूझ बांध, व चिंबल या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते. पुन्हा पाणी साचू नये यासाठी नाल्याची सफाई, व मतीमुळे तुंबलेले नाले खुले करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असेही फर्नांडीस यांनी अधिक माहिती देताना सांगितले.