मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही

By किशोर कुबल | Published: January 25, 2024 04:38 PM2024-01-25T16:38:24+5:302024-01-25T16:38:46+5:30

सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

Due to Modi's visit, the assembly session will not be held on February 6 | मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही

मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनामुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही. प्रश्नोत्तर, शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना व इतर कामकाज त्याऐवजी शनिवारी १० फेब्रुवारी रोजी होईल, त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत ८ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत. सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

पूर्वी २ ते ९ फेब्रुवारी असे अधिवेशन ठरले होते. सभापती म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी गोव्यात येत असल्याने त्या दिवशी कामकाज घेतले जाणार नाही.
दरम्यान, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत आमदारांना १५ अतारांकित प्रश्नांची जी मर्यादा घातली आहे, ती वाढवून द्यावी अशी मागणी बैठकीत केली तसेच पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीची माहिती न देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा व किमान मागील पंधरा वर्षापर्यंतची माहिती दिली जावी, अशी मागणी केली.

सरदेसाई म्हणाले की 'कदाचित काही माजी मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना वाचविण्यासाठी सरकारने ही मर्यादा घातली असावी. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना विरोधकापासून सरकारला वाचवायचे असावे. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला आवश्यक ती माहिती मिळाली पाहिजे. आरटीआय अर्जाला जर पाच वर्षांपूर्वीची माहिती मिळू शकते तर सभागृहात का नाही?, असा सवाल त्यांनी केला.
 

Web Title: Due to Modi's visit, the assembly session will not be held on February 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.