तांत्रिक अडचणीमुळे ९५ टक्के विद्यार्थ्यांचे 'आधार' रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 09:53 AM2023-06-21T09:53:11+5:302023-06-21T09:55:35+5:30
प्रमाणिकरण करण्याची अडचण: पालक, शिक्षण संस्थाही त्रस्त.
पणजी : केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्याचे आदेश दिल्यापासून सर्व राज्यांनी तातडीने हे काम हाती घेतले आहे. राज्य सरकारने देखील त्वरीत सर्व शाळांना आदेश जारी करुन लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्याचे आदेश दिले होते. परंतु अद्याप हे काम १०० टक्के पूर्ण झालेले नाही. अजूनही अनेक असे विद्यार्थी आहेत, ज्यांचे आधार कार्ड तयार झालेले नाही.
कसरती सुरूच
१०० टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यास अनेक अडथळे येत आहेत. एकतर अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने आधार प्रमाणीकरण शक्य होत नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे पालक देखील या गोष्टीला सुरक्षतेच्यादृष्टीने आक्षेप घेतात.
५ टक्क्यांपर्यंत पोहोचावे लागणार
९५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण राज्यात झाले आहे. तरीही ५ टक्के होणे बाकी आहे. या मुलांपर्यंत पोहचण्यात शिक्षण खात्यासमोर अडचण आहे.
राज्यात १४८६ शाळा
राज्यात एकूण १४८६ शांळांची नोंद आहे. या प्रत्येक शाळेना शिक्षण खात्याने यासंबधीत परीपत्रक जारी केले होते. बहुतांश शाळेंनी या परीपत्रकाच्या आदेशाचे पालन केले, तर अनेकजण मात्र यात अपयशी ठरल्या आहेत.
शिक्षण खात्याचे प्रयत्न
कुठलीही योजना लोकापर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे आधार बनविणे आवश्यक केले आहे. तरीही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करण्यास अडचणी येत आहेत. पण शिक्षण खाते १०० टक्के आधार कार्ड प्रमाणीकरण व्हावे यासाठी आपले सर्वोपरी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
शाळांमध्ये खास कक्ष
विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीत करण्यासाठी प्रत्येक शाळेत खास वेगळा कक्ष तयार होता. आवश्यक यंत्रणा पुरविण्यात आली होती. काही संस्थांची मदत यादरम्यान घेण्यात आली.
आम्ही सर्व शाळेंना परीपत्रक काढून याबाबत कृती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बहुतांश सर्व शाळांनी याचे पालन केले आहे. ज्या काही शिल्लक राहिल्या आहेत, याच्यामागे तांत्रिक अडचणी हे मुख्य कारण आहे. काही पालकांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. लवकरच उर्वरीत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्याचा प्रयत्न करु. - शैलेंश झिंगडे, संचालक, शिक्षण खाते